आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar District In 65 Thought Farmer Of Agri Plan Card

जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांकडे कृषिकार्ड, योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील६५ हजार ५५७ शेतकरी भारत संचार निगमचे (बीएसएनएल) कृषिकार्ड वापरत आहेत. बीएसएनएल कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘महाकृषी ३’ योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या योजनेला २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कृिषविषयक माहिती मार्गदर्शन माफक दरात मिळावे, या उद्देशाने बीएसएनएलने ही योजना अंमलात आणली आहे. ‘महाकृषी २’ या योजनेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. ‘महाकृषी ३’ या योजनेला फेब्रुवारीपासून नव्याने सुरुवात झाली. या योजनेत आतापर्यंत २० हजार ८८६ शेतकऱ्यांनी हे कृषिकार्ड घेतले आहेत. या योजनेस २१ ऑक्टोबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना हवामानविषयक सल्ला, खते, बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेची माहिती मिळते.

या योजनेंतर्गत वीस रुपयांत सीमकार्ड मिळते. त्यासाठी १२८ रुपयांचे रिचार्ज दरमहा आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्यास या योजनेंतर्गत तीन सीमकार्ड दिले जातात. यासाठी सातबारा उतारा आवश्यक आहे. कृषी विभागाचा नमुन्यातील दाखला, रहिवासी पुरावा रंगीत फोटो, कृषी अधिकाऱ्याचा दाखला ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे, अशी माहिती बीएसएनएलचे उपमंडल अभियंता (विपणन), डी. एस. ठुबे यांनी दिली.

योजनेचा लाभ घ्या
यायोजनेच्या तिन्ही टप्प्यांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्यांना या योजनेचे कार्ड घ्यायचे असेल, त्यांनी बीएसएनएल कार्यालय किंवा ग्राहक केंद्राशी संपर्क साधावा. या सीमकार्डमध्ये ४०० मिनिटे मोफत टाॅकटाईम, २०० एमबी इंटरनेट डाटा दरमहा, किंवा १२ महिन्यांसाठी एकदाच रिचार्जची सोय आहे, असे ठुबे यांनी सांगितले.