आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Ambulance In Nashik Kumbhamelaair Ambulance In Nashik Kumbhamela

सिंहस्थात ‘एअर अॅम्ब्युलन्स’ला परवानगी, शिखरेवाडीतील जागा महापालिकेकडून उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-सिंहस्थकुंभमेळा कालावधीत आपत्कालीन सेवेसाठी एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी महापालिकेने शिखरेवाडी मैदानावरील शंभर बाय शंभर चौरस फुटांच्या जागेचा तात्पुरता वापर करण्यास परवानगी दिली आहे. पार एअर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई रघुनाथ आर. मोहिते फाउंडेशन ट्रस्ट यांनी सिंहस्थात आपत्कालीन सेवेसाठी एअर अॅम्ब्युलन्स लॅँडिंग हेलिकॉप्टर सर्व्हिससाठी हेलिपॅडला विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्याला महापालिकेने अटी-शर्तींसह परवानगी दिली अाहे.
सिंहस्थ कुंभमेळा कालावधीसाठी एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टरची सेवा पुरविण्यास शिखरेवाडी मैदानाच्या जागेपैकी १०० बाय १०० चाैरस फूट जागा हेलिपॅडसाठी दररोज एका दिवसासाठी ५०० रुपये परवाना शुल्क आणि त्यावर केंद्र शासनाच्या १४ टक्के सेवाकराची रक्कम याप्रमाणे महापालकेच्या अटी-शर्तींसह जागा वापरण्यास परवानगी दिली आहे. जागा वापरण्याअगाेदर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांची परवानगी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.

सेवा ठरणार उपयुक्त
महापालिकेनेसिंहस्थ कालावधीत शिखरेवाडी मैदानावरील जागेच्या वापरास परवानगी दिल्याने आपत्कालीन परिस्थितीत येथील एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर सेवा उपयोगी ठरणार आहे. डॉ.गिरीश मोहिते, विश्वस्त, रघुनाथ मोहिते फाउंडेशन