आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर डेक्कन विमानसेवा सप्टेंबरपासून निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक-पुणेअाणि मुंबई -नाशिक या दाेन मार्गांवर सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती एअर डेक्कनने नवी दिल्लीमध्ये झालेल्या ‘विंग २०१७, सब उडाे सब जुडाे’ या चर्चासत्रादरम्यान दिल्याचे खासदार हेमंत गाेडसे यांनी सांगितले. याशिवाय, इंडिगाे अाणि स्पाईस जेट या कंपन्यांनीही रुची दाखवत अभ्यास करण्याचे अाश्वासन दिल्याचे ते म्हणाले. 
 
केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री गजपथी राजू जयंत सिन्हा यांच्या हस्ते या परिषदेचे उद;्घाटन झाले. यावेळी एअरपाेर्ट अथाॅरिटीचे चेअरमन खुल्लर यांच्यासह विविध राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. उड्डाण याेजनेची प्रभावी अंमलबजावणी हाेण्यासाठी काय सवलती दिल्या जातील, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात अाले. महाराष्ट्राच्या नागरी हवाई वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव वत्सला नायर सिंग यांनी राज्य शासनाने दिलेल्या सवलतींची माहिती देताना सांगितले की, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी याेजनेअंतर्गत नाे एअरपाेर्ट चार्जेस, लंॅडिंग, पार्किंग अाणि टीएनएलसी माफ केले अाहे. करपात्रमूल्य सेवा कर १० टक्क्यांच्यावर अाकारणार असून राज्य शासनामार्फत पाेलिस अाणि अग्निशमन सेवा पुरविली जाणार अाहे. वीज-पाणी अाणि सवलतीच्या दरात इतर सुविधा देणार अाहाेत. एअर लाईन्सद्वारे स्वत: ग्राऊंड हाताळणी यासारख्या बाबींचे दाखले दिले. विविध विमान कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित हाेते. 

भाडे १५०० ते १८०० रुपये 
नाशिक महाराष्ट्रातील इतर विमानतळांवरून सेवा सुरू करावी यासाठी खासदार गाेडसे, वत्सला नायर, यू. पी. कुकाणे यांनी सर्वच एअरलाईन्सशी चर्चा केली. एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी डीजीसीएकडे परवानगी मुंबईला टाईम स्लाॅट मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे स्पष्ट केले. साधारणपणे १५०० ते १८०० रुपये भाडे नाशिकवरून मिळणाऱ्या सेवेचे असेल. 
 
बातम्या आणखी आहेत...