आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालथ्या घड्यावरः दिवाळीत गेल्या वर्षीपेक्षा वाढले वायू प्रदूषण; आवाजात घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवले जाऊनही यंदाच्या दिवाळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. ध्वनिप्रदूषण कमी झालेले असले तरी फॅन्सी फटाक्यांच्या अतिवापरामुळे हवेत घातक वायूंचे प्रमाण वाढले आहे.

दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषण वाढत असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेतील घातक वायूंची तपासणी केली जाते. यंदा दिवाळीपूर्वी म्हणजेच 29 ऑक्टोंबर व त्यानंतर 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान हवेची गुणवत्ता तपासणी झाली. त्यात खासकरून दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत घातक वायूंचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. गेल्या वर्षी पालिकेच्या एकमेव यंत्राद्वारे तपासणी झाली होती. यंदा मात्र तीन विविध जागांवर हवेची गुणवत्ता तपासली गेली. ध्वनिप्रदूषणाची तीव्रता मोजणार्‍या यंत्रांच्या अहवाल परीक्षणाचे काम सुरू असल्यामुळे त्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच नव्हती.

स्फोटके विभागाकडे पाठवला अहवाल

दिवाळीच्या कालावधीतील हवेची गुणवत्ता चाचणी केली असून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात सल्फरडाय ऑक्साइड व अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, त्याची कारणे शोधण्यासाठी स्फोटके विभागाकडे अहवाल पाठवला आहे.

ए. एस. फुलसे, विभागीय प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक