आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून विमानसेवा, प्रवासी बुकिंगची माेठ्या उद्याेगांची हमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकहून राज्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू व्हावी, याकरिता अाता माेठे उद्याेगही रिंगणात उतरले अाहेत. हे उद्याेग अापल्याकडील देशांतर्गत विमानसेवेचा मासिक किंवा सप्ताहात किती कर्मचारी वापर करतात, काेणत्या शहरांकरिता हा प्रवास हाेताे अाणि काेणत्या शहरांतून विमानसेवेचा वापर करून येतात याची माहिती विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना पाठविणार अाहे. नाशिकमधून सर्वात अगाेदर विमानसेवा सुरू करणाऱ्या कंपनीला किमान पन्नास टक्के बुकिंग देण्याची वार्षिक हमीपत्र देणार अाहे. यामुळे पुढील महिन्यात राज्य सरकारच्या बाेलीप्रक्रियेत सहभागी हाेणार असलेल्या विमान कंपन्यांना नाशिकहून विमानसेवेकरिता प्राेत्साहन मिळू शकेल.

नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) ने याकरिता पुढाकार घेतला असून, याकरिता माेठ्या उद्याेगांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक गुरुवारी (दि. ८) निमा हाऊस येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार हेमंत गाेडसे हाेते. निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस उदय खराेटे, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गाेपाळे, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, रवी वर्मा, मनीष काेठारी अादी व्यासपीठावर हाेते.

नव्या विमान उड्डयन धाेरणामुळे राज्यातील दहा शहरे विमानसेवेने जाेडली जाणार अाहेत. या शहरांना विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना सरकार प्रति अासन अनुदान देणार असल्याने कंपन्यांत व्यावसायिक स्पर्धा वाढणार अाहे. याचा फायदा नाशिकला हाेऊ शकताे. यामुळे केंद्र राज्य सरकारच्या पातळीवर एक लाेकप्रतिनिधी म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न अापण केले असून, अाता शहरातील अाैद्याेगिक इतर जबाबदार संघटनांनी या प्रयत्नांना जाेड देण्याची गरज अाहे. यासाठी अापल्याकडील डेटा विमान कंपन्यांना पाठवावा, असे अावाहन खासदार गाेडसे यांनी केले. यावेळी एबीबी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, ग्लॅक्साे, जीएसके, किर्लाेस्कर, थायसन क्रृप, लीग्रॅण्ड अादी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचा डेटा देण्याचा निर्णय
नाशिकहून देशांतर्गत शहरांत जाणाऱ्या तेथून नाशिकला येणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी कर्मचारी यांच्या प्रवासाचा डेटा विमान कंपन्यांना मेलद्वारे दिला जावा. तसेच, जी कंपनी नाशिकहून अगाेदर सेवा सुरू करेल तिला याच कंपन्यांच्या देशभरात असलेल्या विविध शहरांतील प्रकल्प, विमानसेवेकरिता प्राधान्य देतील, अशी ग्वाही देण्याचा निर्णय या बैठकीत निमाच्या नेतृत्वाखाली घेण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...