आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातून पुण्यासोबत सुरतसाठीही विमानसेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक विमानतळावरून मुंबईपाठाेपाठ अाता नाशिक-पुणे अाणि नाशिक-सुरत विमानसेवा नाशिककरांना उपलब्ध हाेईल. त्याकरिता मुंबई-नाशिक-मुंबई अशी सध्या सेवा देत असलेल्या श्रीनिवास एअरलाइन्सने पुढाकार घेतला अाहे. पुण्यासाठी बुकिंग अाजपासून सुरू हाेत असून, अाॅगस्टपासून विमान उड्डाणे सुरू हाेतील. सुरतसाठी त्याच दिवशी बुकिंग सुरू हाेत असून, पहिल्या उड्डाणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार अाहे. दहा अासनी विमानांचा वापर या दाेन्ही शहरांसाठी सेवा देताना केला जाईल. दरम्यान, एचएएलकडून साडेचारएेवजी अाता सायंंकाळी सात वाजेपर्यंत एअर ट्रॅफिक कंट्राेल वाॅच (एटीसी) मिळणार असून, विमानतळाचे दरही कमी करण्याबाबत एचएएल प्रशासन सकारात्मक असल्याने इतर विमान कंपन्याही नाशिक विमानतळावरून सेवा सुरू करण्याची शक्यता अाहे.

मुंबई-नाशिक-मुंबई अशी विमानसेवा श्रीनिवास एअरलाइन्सने १३ जुलैपासून सुरू केेली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळताे अाहे. कंपनीन दिलेले सिंहस्थ पॅकेज या प्रतिसादामागील प्रमुख कारण अाहे. ११,५०० रुपयांत नाशिकदर्शन, गाेदावरी स्नान अाणि त्र्यंबकेश्वरदर्शन मुंबईकरांना यातून हाेत अाहे. दरम्यान, एचएएलकडून अाता एअर ट्रॅफिक कंट्राेलचा वाॅच सायंकाळी सात वाजेपर्यंत मिळणार असल्याने पुण्यासह देशातील काही प्रमुख शहरांसाठी सेवा देणे विमान कंपन्यांना अाता शक्य हाेणार अाहे. त्यातही श्रीनिवास एअरलाइन्सने अाघाडी घेतली असून, नाशिक-पुणे अाणि नाशिक-सुरत अशा दाेन सेवा सुरू केल्या जातील, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात अाले.
टाेल फ्री क्रमांकावर करा तिकीट बुकिंग
श्रीनिवास एअरलाइन्सने प्रवाशांना तिकीट बुकिंग करता यावे, यासाठी १८०० २०० ३८३३ हा टाेल फ्री क्रमांक प्रसिद्ध केला अाहे. त्यावर काॅल करून नाशिककरांना मुंबई, पुणे किंवा सुरतकरिता तिकिटांची नाेंदणी करता येते.

बुकिंग अाजपासून
नाशिक-पुणेसेवेकरिता २२ जुलैपासून बुकिंग सुरू झाले. अाॅगस्टपासून ही सेवा उपलब्ध हाेईल. एकेरी ५५०० रुपये प्रवासभाडे अाकारले जाईल. अाॅगस्टपासून नाशिक-सुरत सेवेकरिता बुकिंग सुरू होईल. एकेरी प्रवासभाडे ६,५०० रुपये असेल, असे कंपनीचे जनसंपर्क व्यवस्थापक हेमंत वाणी म्हणाले.

एचएएलकडूनअद्याप निर्णय नाही
साडेचारवाजेएेवजी सायंकाळी सात वाजेपर्यंत एअर ट्रॅफिक कंट्राेलचा वाॅच मिळण्याबाबत एचएएलकडून अधिकृत पत्र विमान कंपन्यांना मिळणे अपेक्षित हाेते. मात्र, ते मिळाले नसल्याची बाब समाेर अाली अाहे. या सेवेकरिता एचएएलकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच याबाबत अधिकृत घाेषणा हाेण्याची चिन्हे अाहेत.
बातम्या आणखी आहेत...