आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण प्रतिसादानुसार वर्षाला, ४२ हजार विमान तिकीट खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकहून देशांतर्गत विमानसेवा सुरू हाेण्यासाठी विमानसेवेचा वापर करणाऱ्यांचा डेटा विमान कंपन्यांना पुरविण्याच्या हेतूने निमाने सुरू केलेल्या अाॅनलाइन सर्वेक्षणाला अातापर्यंत मिळालेल्या प्रतिसादानुसार दरवर्षी २१,४१६ रिटर्न तिकिटांची बुकिंग हाेत असल्याचे पुढे अाले अाहे. ही संख्या दाेन्ही बाजूने ४२, ८३२ इतकी अाहे. नाशिककर विमानाने बंगळुरूला सर्वाधिक प्रवास करत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले.
केंद्र सरकारने प्रादेशिक विमानसेवेला बळकटी देण्याचे नवे धाेरण स्वीकारले असून, अशी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना विशिष्ट अनुदानही दिले जाणार अाहे. यामुळे नाशिककरांची विमानसेवेची प्रतीक्षा संपेल. मात्र, त्याकरिता विमान कंपन्यांना नाशिकहून प्रवासी जाण्याची येण्याची संख्या प्राथमिक स्तरावर लक्षात अाणून देणे अावश्यक अाहे. त्याबराेबरच किती प्रवासी अाम्ही वर्षभरात देऊ, याची हमी विमान कंपन्यांना दिल्यास ही सेवा लवकर सुरू हाेऊ शकेल, हा उद्देश या सर्वेक्षणामागे अाहे.

सर्वेक्षणात विचारली ही माहिती : नाशिकमधूनविमानाद्वारे देशातील कुठल्या शहरात अापण जाता, किती वेळा जाता अाणि कुठल्या शहराकरिता विमानसेवेची अापणास गरज अाहे, यासह कुठल्या शहरातून अापण विमानसेवेचा वापर करून शहरात येता, याची माहिती घेतली जात अाहे. संकलित केलेली माहिती विमान कंपन्यांपर्यंत पाेहाेचविली जाणार अाहे.

संस्था-संघटनांनी सहभागी व्हावे
^यासर्वेक्षणात विमान सेवेचा वापर करीत असलेल्यांची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व नागरिक, संस्था संघटनांनी सहभागी व्हावे. नाशिकला विमानसेवा सुरू व्हावी याकरिता हे अत्यंत अावश्यक अाहे. -गाैरव धारकर, चेअरमन, अायटी समिती, निमा

नाशकात विमान प्रवाशांची संख्या प्रत्यक्षात अधिक
निमाच्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या संस्था-व्यक्तींची ही संख्या अाहे. त्यांची सं‌ख्या जमेस धरली तर नाशिकमधून विमानाने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट हाेते.

अधिक स्पष्टता येणार
प्रादेशिक विमान सेवेला बळकटी देण्याचे केंद्राचे धाेरण अाहे. त्यानुसार विमान सेवा पुरविणाऱ्या कंंपन्यांना प्रतिप्रवासी अनुदान दिले जाणार असल्याने नाशिकमधून किती लाेक विमान प्रवास करतात तसेच ते काेणत्या शहरात ये-जा करतात हे या सर्वेक्षणातून स्पष्ट हाेतअाहे. या सर्वेक्षणात अजुनही सहभागी हाेता येणार असल्याने पुढील काळात यात अधिक स्पष्टता येणार अाहे.

असे हाेता येते सर्वेक्षणात सहभागी
यासर्वेक्षणात सहभागी हाेण्यासाठी अाॅनलाइन https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSewGwd4vYtsQwacVgJcjxXL3KUM3DZxLb1040zKn4tljv8N_w/viewform या लिंकवर जाऊन माहिती भरता येते. यातूनच सगळा डेटा एकत्र केला जाताे. ताे विमान कंपन्यांना पुरविला जाणार अाहे.

सर्वेक्षणातून या शहरांना पसंती
या सर्वेक्षणातून समाेर अालेल्या माहितीनुसार, नाशिककर बंगळुरू, मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद, नागपूर, गाेवा, काेलकाता या शहरांकरिता विमानसेवेचा वापर अधिक प्रमाणात करतात. सर्वेक्षणात अातापर्यंत सहभागी झालेल्या ८९ टक्के प्रवाशांनी विमानसेवा देणाऱ्या कंपनीला लाॅयल्टी प्राेग्रॅमनुसार (शाश्वती) पसंती देण्याचेही निश्चित केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...