आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानसेवेप्रश्नी ठोठावणार आता मंत्रालयाचे दार; उद्योेजकांच्या संघटनेकडून चर्चेची तयारी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य सरकारच्या आडमुठे धोरणामुळे नाशिकची विमानसेवा रखडण्याची चिन्हे असून, या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे वारंवार चर्चेस वेळ मागूनही मिळत नसल्याने आता या प्रश्नी मंत्रालयात चर्चा करण्याची तयारी नाशिकच्या उद्योजक संघटनांनी चालविली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे उद्योजकांचे लक्ष लागले असून, त्यांच्याशी भेटीसाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.
नाशिक विमानतळाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटत आले असून, विमानसेवा सुरू होण्याची नाशिककरांना प्रतीक्षा असतानाच राज्य शासनाचे अतिरिक्त सचिव पी. एस. मीणा यांनी एचएएलला पत्र पाठवून विमानतळ उभारणीकरिता खर्च झालेल्या 84 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मुळात एचएएल व राज्य शासन यांच्यातील करारात अशा प्रकारची रक्कम देण्याची तरतूद नसल्याने एचएएल अशा प्रकारची रक्कम भरण्यास तयार नाही. दुसरीकडे विमानतळ चालविण्यास नामांकित कंपन्या तयार असल्या तरी टेंडर काढणे एचएएलला अवघड झाले आहे. यामुळे विमानसेवा रखडली आहे.
नाशिक शहराचे नुकसान
विमानसेवा रखडल्याचे दुष्परिणाम राज्य शासन आणि एचएएल दोहोंनाही भोगावे लागणार नाही तर शहरवासीयांना भोगावे लागणार आहेत. कारण, यामुळे शहराच्या विकासाचा वेग मंदावणारा आहे.
मंगेश पाटणकर, सरचिटणीस, निमा

आता मंत्रालयाची वाट

४जिल्हाधिकारी लक्ष देत नसल्याने आता या प्रकरणी मंत्रालयात संबंधित मंत्र्यांकडे दाद मागण्यात येणार आहे. याकरिता पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, त्यांनाच या प्रकरणी गळ घालण्यात येणार आहे.
मनीष कोठारी, अध्यक्ष, निमा
टाळाटाळ केल्याचा आरोप
दरम्यान, उद्योजकांनी या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे वारंवार वेळ मागितला. बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढता येणे शक्य असल्याने अशी बैठक होणे नितांत गरजेचे असल्याचे उद्योजकांचे म्हणणे असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र असे पत्र आपल्याला प्राप्त झाले नसल्याचे सांगत भेटीकरिता वेळ देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला.