आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळाबाबतची बैठक निर्णयाविना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ओझर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी एचएएलकडून दरमहा एक लाखापेक्षा कमी भाडे अाकारण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावासंदर्भातील बैठकीस एचएएलचे अध्यक्ष त्यागी उपस्थित राहिल्याने साेमवारी (िद. १५) सकारात्मक चर्चा हाेऊनही निर्णय हाेऊ शकला नाही.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे विमानतळ हस्तांतरणाबाबत ही बैठक झाली. विमानतळ इमारत सहा महिन्यांपूर्वीच सज्ज होऊनही त्याची जबाबदारी हस्तांतरणावरून वाद सुरू आहे. एचएएलने त्यासाठी जमीन दिली असून टर्मिनस इमारतीसाठी शासनाने ८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवाय, त्याची जबाबदारी यापूर्वीच एचएएल राज्य शासनात झालेल्या करारात नमूद आहे. परंतु, एचएएलने खर्च शासनाला परत देण्याबाबत स्पष्टता नाही. पण, विमानतळाची सर्व जबाबदारी एचएएलचीच ठरविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने झालेला खर्च मिळावा किंवा दरमहा एक लाख रुपये भाडे मिळावे, अशी मागणी केली होती. एचएएलने त्यास नकार दिला. त्यानंतर आता पुन्हा नागपूर येथे झालेल्या या बैठकीत शासनाने दीर्घकाळासाठी दरमहा कमी भाडे दरात एचएएलला विमानतळ हस्तांतरण करण्याचा पर्याय दिला. परंतु, बैठकीस उपस्थित एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक एस. सुब्रमण्यम यांनी निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता पुन्हा याबाबत एक बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच विमानतळ हस्तांतरणासह सेवा सुरू होण्याचा अंितमनिर्णय हाेण्याची शक्यता आहे. बैठकीस अतिरिक्त सचिव मीणा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. वाय. देशमुख, जिल्हाधिकारी विलास पाटील हेही उपस्थित होते.