आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar, Bhujbal & Manohar Joshi On One Stage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपमुख्यमंत्री होणार्‍यास मुख्यमंत्री होण्यास उशीरच होतो- जोशी सरांची फटकेबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिवसेनेतील जुने सहकारी पालकमंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय फटकेबाजी ऐकण्यास मिळेल म्हणून व्यापारी बॅँकेच्या उदघाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती; मात्र जुगलबंदीच न रंगल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला. सामना पराभूत होत असल्याचे लक्षात येताच जोशी सरांनी तुफानी फटकेबाजी करून शेवटच्या षटकात विजयर्शी खेचून आणल्याने उपस्थितांना आनंदोत्सवाची संधी लाभली.

भुजबळ आघाडीला- आघाडीला जाण्याची संधी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना मिळाली. सेहवागच्या स्टाईलने ते चौकार, षटकार लगावतील असे वाटत असताना भुजबळांनी दोन एक वेळा दुहेरी, तर संधी मिळताच चौकार, षटकार लगावला. आज व्हॅलेंटाइन डे असल्याने प्रेमाने बोलणार असल्याचे प्रथमच सांगून टाकले. बॅँकेच्या नवीन कॉर्पोरेट लुकवर त्यांनी सदरा-धोतरवरील जुनी इमारत कोट, टॉय घालून नवीन पध्दतीने सजवल्याचे सांगून चौकार ठोकला.

पवार वनडाउनला- सचिन तेंडुलकरप्रमाणे वनडाउन फलंदाजीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवाराच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र राजकीय फटकेबाजी केली नाही. जिल्हा बॅँकेच्या संचालकांचे गट बदलू राजकारण, नोकर भरती, खासगी ऑडिटरांच्या मुद्यावर षटकार लगावले.

जोशी सरांनी सावरले- पहिले दोन भरवश्याचे फलंदाज धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्याने सर्व जबाबदारी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर येऊन ठेपली. त्यांनी पहिल्या चेंडूपासून तुफानी फलंदाजी करून आश्चर्यांचा धक्का दिला. माझ्या बरोबर उपमुख्यमंत्री येणार हे माहीत नव्हते. अजित पवार येणार हेच माहीत होते. ते येतील थोडी दमबाजी करतील, कोण मुख्यमंत्री असावे हे सांगतील; पण त्यांनी सर्व गुपित ठेवले. त्यांचे भाषण व राज्यकारभार जास्त आवडतो. उपमुख्यमंत्री होणार्‍या पुढार्‍याला मुख्यमंत्री होण्यास उशीरच होतो असे सांगून चौकार ठोकला. दुसर्‍या क्षणी भुजबळांकडे बघून तुम्ही असे का पाहाता आहे माझ्याकडे म्हणून दुसरा चौकार ठोकला. भुजबळांना मित्र संबोधतांना त्यांना कधी, कुठे जावे, रहावे हे अचुक कळते असे म्हणून षटकारच ठोकला.