आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना फसवले : शिवसेना अन् भाजपचा संघर्ष म्हणजे काळू-बाळूचा तमाशा- -अजित पवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित पवार यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. - Divya Marathi
अजित पवार यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.
नाशिक - समृद्धी महामार्गासाठी विराेध करणारे शिवसेनेचे मंत्री नागपूरला जमीन संपादनाचा कार्यक्रम घेतात. कर्जमाफीची घाेषणा केल्यानंतर शिवसेना श्रेय घेते. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात काही पडत नसल्याचे बघून जिल्हा बँकेसमाेर विराेधाचा ढाेल बडवते. मुदतपूर्व निवडणुकांचे अाभासी चित्र निर्माण करणारे प्रत्यक्षात सत्तेतून बाहेर पडण्यास तयार नाहीत. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपला ६० हजार काेटींची ठेव शेतकरी कर्जमाफीसाठी द्यायला तयार नाही. हे सर्व चित्र बघितले तर शेतकऱ्यांना फसवण्यासाठी शिवसेना व भाजप हे दाेन्ही पक्ष काळू-बाळूच्या तमाशागत संघर्षाचे वातावरण निर्माण करत असल्याची बाेचरी टीका माजी उपमुख्यमंत्री व  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाशिकमध्ये शनिवारी केली.   
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी भाजप - शिवसेनेवर हल्लाबाेल केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी अाता फसवी वाटू लागली अाहे. प्रत्यक्षात हातात काही पडत नाही. दुसरीकडे या मुद्यावरून सेना व भाजप हे दाेघे अापल्यात संघर्ष असल्याचे दाखवून लक्ष वेधत अाहेत. शिवसेनेबाबत तर काय बाेलायचे हाच प्रश्न अाहे. कर्जमाफी झाल्यावर शिवसेनेने अामच्यामुळे झाले असे श्रेय घेतले. मात्र, हातात काही पडत नसल्याचे बघून पुन्हा विराेधाचे राजकारण सुरू केले. शिवसेनेचे १२ मंत्री असून त्यांनी एकजात भाजपवर दबाव अाणला तर कर्जमाफी हाेऊ शकते. मात्र, ते साेडून जिल्हा बँकेवर पैशांसाठी ढाेल वाजवत अाहेत. शासनाकडून बँकेत पैसे अाले वा शेतकऱ्यांची यादी अाली तर कर्जमाफी हाेऊ शकते. त्यामुळे येथे ढाेल वाजवण्यापेक्षा शासनाकडून पैसे प्रत्यक्षात कसे येतील याचे नियाेजन केले तर अधिक बरे हाेईल. भाजपकडून समिती नेमली अाहे, अभ्यास सुरू अाहे अशाच उत्तरात वेळकाढूपणा केला जात अाहे. अकलेचा वापर न करता निव्वळ नुसतेच जीअार काढले जात अाहेत. स्थानिक पातळीवर काेणत्या जीअारचा वापर काेठे करायचा या पेचात अधिकारी डाेके धरून बसले अाहे. शिवसेनेला खराेखरच कर्जमाफीची इच्छा असेल तर मुंबई महापालिकेतील ६० हजार काेटींची ठेव राज्य शासनाला याेग्य त्या व्याजदरावर देण्याचे अाैदार्य दाखवणार का ?  असा सवाल करून कैचीत पकडले. शिवसेनेचे मंत्री अधिकार नाही असे म्हणतात. मग केबिन, बंगले, गाड्या, पालकमंत्री म्हणून जिल्ह्यांचा कारभार कसा करतात असे सांगत त्यांनी जाेरदार टाेलेबाजी केली.  
 
मीरा कुमारांना माझे वैयक्तिक मत   
राष्ट्रपतिपदासाठी विराेधी पक्षांच्या उमेदवार असलेल्या मीरा कुमार यांना माझे वैयक्तिक मत अाहे. मतदान करण्यासाठी व्हीप काढण्याची तरतूद नाही. त्यामुळे मीरा कुमार यांना मतदान करण्याबाबत व्हीप निघणार नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या मतदारांना अावाहन निश्चित केले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केेले.   
 
वडीलधाऱ्यांचा सन्मान करा;कार्यकर्त्यांना सल्ला    
नाशिक - संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दाैऱ्यावर अालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत:च्या वाॅर्डात निवडून न येणाऱ्यांना महत्त्वाची पदे कशासाठी द्यायची, असा सवाल करत चमकाे पदाधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. दाेन महिन्यांत शहर व जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी तयार करा, असे सांगतानाच पक्षातील वडीलधाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान करा. हाेर्डिंगवर फाेटाे कापण्याइतका कमीपणा काेणी दाखवू नये व फाेटाे नाही म्हणून काेणी रुसवाफुगवा करू नये, असे सांगत त्यांनी नेत्यांना चांगलाच दम दिला.
बातम्या आणखी आहेत...