आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Speak About Nashik Developement Issue At Nashik

विभागासाठी 965 कोटींचा नियोजन आराखडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या आदी मुद्दे विचारात घेऊन नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांसाठी 965 कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महसूल आयुक्त कार्यालयात झालेल्या वार्षिक नियोजन 2014-15 च्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्यासाठी 275 कोटी, धुळे 115 कोटी, जळगाव 235 कोटी, अहमदनगर 280 कोटी आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी 60 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, अहमदनगरचे पालकमंत्री मधुकरराव पिचड, नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जळगावचे पालकमंत्री संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्ष जयर्शीताई पवार (नाशिक), विठ्ठलराव लंघे पाटील (अहमदनगर), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, प्रधान सचिव र्शीमती रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त संजय खंदारे, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नियोजन विभागाचे उपायुक्त उपस्थित होते.

नाशिकसाठी झाली 22.30 कोटींची वाढ
विभागासाठी 2013-14 साठी 880 कोटींचा आराखडा मंजूर केला होता, त्यात 165 कोटींची वाढ केली. शासन निर्देशानुसार 886.44 कोटी निश्चित असताना 78.56 कोटींची वाढ करून 965 कोटींच्या आराखड्यास अंतिम मंजुरी दिली. जिल्ह्यासाठी गतवर्षी 250 कोटी निधी दिला होता. यंदा निश्चित 252.70 कोटीच्या आराखड्यात 22.30 कोटींची वाढ करून 275 कोटी रुपयांस मंजुरी दिली. गेल्या वर्षीपेक्षा 75 कोटी रुपये अधिक आहेत. धुळे 8.20, जळगाव 20.32, अहमदनगर 17.25, तर नंदुरबारच्या आराखड्यात बैठकीत 10.49 कोटींची ऐन वेळी वाढ केली.

विश्वासात घेऊन निर्णय
नियोजन आराखड्याबाबत पालकमंत्र्याशी चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी निधी कमी केला असला तरी सामाजिक न्याय, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पूर्ण निधी दिला आहे. प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने निधीतून अधिक कामे होण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांना जादा अधिकार दिले आहेत.

मागणी करणार
सिंहस्थानिमित्त भुजबळांनी अधिक निधीची मागणी केली, मात्र अर्थसंकल्पात नवीन आराखड्यास मंजुरी दिली जाईल. केंद्राकडे निधीची मागणी करणार असून, मोन्टेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी बैठकीत सांगितले.