Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Ajitchand,Chhaganchand Submarge The Banks-Raj Thakare

अजितचंद, छगनचंद असते तर बँक कधीच बुडाली असती-राज ठाकरे

प्रतिनिधी | Jan 19, 2013, 07:19 AM IST

  • अजितचंद, छगनचंद असते तर बँक कधीच बुडाली असती-राज ठाकरे

नाशिक- ‘राजकारणावर बोलणार नाही’ असे प्रारंभीच जाहीर करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नामको बॅँकेच्या इमारत उद्घाटन कार्यक्रमात मात्र सत्ताधा-यावर नेहमीच्या शैलीत तुफानी टोलेबाजी केली. ‘हुकूमचंद यांचे नाव जर अजितचंद, छगनचंद असते तर नक्कीच ‘नामको’ बॅँक बुडाली असती,’ अशी कोटी करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली.

नामको बॅँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि बॅँकेचे अध्यक्ष हुकूमचंद बागमार यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पर्दापणानिमित्त शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी राज म्हणाले की, सहकारक्षेत्राशीसंबंधित व्यासपीठ असल्यामुळे पत्रकारांनी राजकीय टोलेबाजीची अपेक्षा करू नये. आजघडीला अनेक बॅँकांचे लोक येऊन भेटतात. ‘साहेब, आज बॅँकेचा पाचवा वर्धापनदिन आहे,’ असे सांगतात. ‘बॅँक कशी चाललीय असे विचारले तर पाच वर्षांपूर्वीच बुडाली,’ असेही सांगतात. राज्य सरकार काय किंवा त्यांच्याशी संबंधित सत्ताधा-याच्या बॅँका बुडण्याचा धडाकाच सुरू आहे. बरे झाले मामांचे नाव हुकूमचंद आहे. विनंतीचंद, अजितचंद वा छगनचंद असते तर बॅँक केव्हाच बुडाली असती.’ राज ठाकरे यांच्या या टोलेबाजीने कार्यक्रमात हास्यकल्लोळ झाला.

नऊ महिने तरी थांबा...!
नाशिक महापालिकेत सत्ता मिळून पाच महिने झाले तरी मनसेचे कामकाज असमाधानकारक, अपयशी अशी टीका प्रसारमाध्यमांतून होत आहे. त्याचा समाचार घेताना ‘डिलेव्हरीसाठी तरी नऊ महिने थांबाल ना’, असा टोला लगावून राज म्हणाले की, पुढील महिन्यात नाशिककरांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मनसेच्या कामकाजाचा
आढावा मांडला जाईल.

Next Article

Recommended