आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्बल 4 तासांच्या युक्तिवादानंतर चुंभळेला तात्पुरता जामीन मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लग्नाचे अामिष दाखवून घटस्फाेटित युवतीवर बलात्कार गर्भपात प्रकरणी नगरसेवकपुत्र अजिंक्य चुंभळे याचा अटकपूर्व जामीन फेटाळतानाच सत्र न्यायालयाने त्याच्या विवाहासाठी पाच दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला अाहे. मात्र, या कालावधीत दरराेज इंदिरानगर पाेलिस ठाण्यात हजेरी माेबाइल, पासपाेर्ट पाेलिसांकडे जमा करण्याचे अादेश न्यायालयाने दिले अाहेत. दरम्यान, सरकारी वकिलांनी चुंभळेच्या जामिनास जाेरदार विराेध केल्याने त्याच्या अटकेची शक्यता लक्षात घेत न्यायालय अावारात तैनात केलेला माेठा फाैजफाटा मात्र मुदतवाढीमुळे रिकाम्या हातीच परतला.
नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचा पुत्र अजिंक्य याच्याविरुद्ध इंदिरानगर पाेलिस ठाण्यात गेल्या बुधवारी (दि. १६) गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. अटक टाळण्यासाठी अजिंक्यने न्यायालयात धाव घेतल्यावर सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी २३ तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला हाेता. अंतिम सुनावणी बुधवारी न्या. नंदेश्वर यांच्यासमाेरच झाली. दुपारी ३.३० वाजता सुरू झालेला सरकार अाणि अाराेपीच्या वकिलांचा युक्तिवाद तब्बल चार तास चालला. संशयित चुंभळेच्या वतीने अॅड. एम. वाय. काळे यांनी सांगितले की, फिर्यादी महिलेच्या मर्जीनुसारच शरीरसंबंध गर्भपात झाला अाहे. अजिंक्यकडे वारंवार पैशांची मागणी करीत त्याने नकार दिल्यामुळे तिने पाेलिसांत तक्रार दिली. हे राजकीय षड‌्यंत्र अाहे. गर्भपात करणाऱ्या डाॅ. उमेश मराठे यास अटक केल्याने पाेलिसांना अावश्यक कागदपत्रे मिळाली असून अजिंक्यच्या अटकेची गरज नाही. त्याच्या वैद्यकीय तपासण्या अथवा इतर माहितीसाठी अावश्यक सहकार्य पाेलिसांना करणार असल्याची ग्वाही देत त्यास जामीन मंजूर करण्याची मागणी केली. सरकारी वकील अजय मिसर यांनी जामिनास विराेध दर्शवित युक्तिवाद केला की, न्यायालयाने अजिंक्य यास हजेरीचे अादेश दिलेले असताना त्याचे उल्लंघन करण्यात अाले. याच मुद्यावर त्याचा जामीन रद्द करावा. तसेच, पीडितेच्या पुरवणी जबाबानुसार अजिंक्यने तिचे खाेटे नाव बनावट स्वाक्षरी करून गर्भपातासाठी जबरदस्ती केली. त्यासाठी लाईन केअर हाॅस्पिटलचे डाॅ. उमेश मराठे यांस अटक करण्यात अाली असून दाेघांना चाैकशीसाठी समाेरासमाेर अाणणे गरजेचे अाहे. अजिंक्यच्या रक्ताचे डीएनएचे नमुने घ्यावे लागणार असून त्याच्याकडे असलेले पीडितेचे फाेटाे, व्हिडिअाे क्लिप मिळवण्यासाठी पाेलिस काेठडीची अावश्यकता अाहे. त्याच्यावर दंगल, हाणामारीचे गुन्हे असून अटकपूर्व रद्द करावा.

फिर्यादीतर्फे अॅड. जयदीप वैशंपायन यांनी अॅड. काळे यांनी पीडितेवर केलेल्या अाराेपांवर अाक्षेप घेत सांगितले की, पीडितेची कुठलीही मर्जी नसताना केवळ लग्नाचे अामिष दाखवून तिची फसवणूक करत संमती घेतल्याचे भादवि कलम ९० अन्वये दिसून येते. फिर्याद दाखल झाल्यापासून तिच्या घरासमाेर अज्ञात लाेकांकडून धमकाविण्याचा प्रकार सुरूच अाहे. याबाबत इंदिरानगर दिंडाेरी पाेलिसांकडे तक्रार दिली अाहे, त्याची दखल घ्यावी. पीडितेला इन कॅमेरा म्हणणे मांडायचे असल्याची मागणी करताच न्यायालयानेही त्यास मंजुरी दिली. त्यानुसार पाेलिस बंदाेबस्तात पीडितेला न्यायालयासमाेर हजर करून जबाब नाेंदविण्यात अाला. दरम्यान, न्यायालयाने दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद एेकून घेत सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरीत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

अजिंक्यनेच उकळले तीन लाख... : अॅड.वैशंपायन यांनी अॅड. काळे यांचे पीडितेवर पैशांसाठी संमती दिल्याचे अाराेप खाेडून काढत याउलट अजिंक्य यानेच वेळाेवेळी युवतीला धमकावून गेल्या काही महिन्यात तब्बल अडीच ते तीन लाख रुपये त्याच्या मित्रांच्या वेगवेगळ्या खात्यावर पैसे जमा करायला सांगितल्याचा मुद्दा मांडला. त्याचे व्हाॅट‌्सअॅप चॅटिंगही त्यांनी न्यायालयासमाेर सादर केले.

डाॅ. मराठे यांची कारागृहात रवानगी
यातीलच गर्भपात केल्याप्रकरणी तीन दिवसांपासून पाेलिस काेठडीत असलेले स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. उमेश मराठे यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अाली. त्यानुसार त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात अाली. मात्र, रात्री उशिरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाल्याचे पाेलिसांनी सांगितले.
पाेलिसांना पुन्हा अपयश
बलात्कार गर्भपातासारख्या गंभीर गुन्ह्यात संशयिताविराेधात पुरेसे पुरावे असताना त्यास अटक हाेणारच असा दावा पाेलिस अाणि सरकारी वकिलांकडून केला जात हाेता. सुनावणी लांबल्याने अटकपूर्व फेटाळताच पाेलिसांनी संशयित पळून जाऊ नये, याची खबरदारी घेत माेठा फाेजफाटा तैनात केला हाेता. मात्र, त्यास पुन्हा अंतरिम मिळाल्याने सरकारी वकिलांचे प्रयत्न अपयशी ठरल्याने पाेलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. त्याचवेळी चुंभळे यांचे समर्थक माेठ्या संख्येने न्यायालय अावारात हजर राहून जणू पाेलिसांनाच अाव्हान देत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

सरकार पक्षातर्फे अजिंक्यविराेधात अनेक पुरावे न्यायालयाचे निवाडे सादर केल्यानंतर त्याचा अटकपूर्व फेटाळण्यात अाला असला तरी त्याच्याकडून लागलीच पुन्हा उच्च न्यायालयात जाण्यासाठी २५ तारखेला हाेणाऱ्या लग्नासाठी जामीन मागण्यात अाला. अॅड. मिसर यांनी त्यास विराेध करीत याच न्यायालयाने दिलेल्या अटींचे त्याने उल्लंघन करूनही पुन्हा अटींवर जामीन देणे याेग्य नसल्याचे सांगून म्हटले की, अाधीच अंतरिम दिलेला असतानाही पीडितेला धमकावण्याचे प्रकार सुरू अाहेत. अखेरीस न्यायालयाने लग्नाच्या मुद्यावर २८ तारखेपर्यांत अंतरिम जामीन देत दरराेज सकाळी १० ते १२ दरम्यान पाेलिसात हजेरी लावण्याचे माेबाइल, पासपाेर्ट जप्तीचे अादेश दिले. तसेच, तीन रक्ताच्या नात्यांच्या नावे, अाेळखपत्र पाेलिसात सादर करण्याच्या पीडितेला धमकावण्याचे अथवा दबाव अाणण्याच्या अटी घालून दिल्या.
बातम्या आणखी आहेत...