आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akash Chhajed Resign For Tree Authority Comity Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 ‘वृक्ष प्राधिकरण’चा आकाश छाजेड यांनी दिला राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर घोषित झालेल्या नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील नियुक्ती झालेले स्वीकृत नगरसेवक आकाश छाजेड यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य पदाचा शुक्रवारी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांच्या नियुक्तीने पक्षात नाराजी व्यक्त होऊन घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता.

काँग्रेस शहराध्यक्षपदाबाबत निर्माण झालेल्या वादानंतर पुन्हा समितीवरदेखील नियुक्ती झाल्याने छाजेड घराणेशाहीविरोधात कॉँग्रेस पक्षांतर्गतच आरोप - प्रत्यारोपांना प्रारंभ झाला होता. त्यामुळे समितीचे सदस्यपदच नको, अशी भूमिका घेत छाजेड यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. महापौर यतिन वाघ यांनी या समितीची घोषणा केली होती. समितीत केवळ शेखर गायकवाड व राजेश पंडित या दोनच पर्यावरणप्रेमींची निवड करण्यात आली होती. या प्रकारानेदेखील समिती वादग्रस्त ठरली असून, हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नसल्याचे छाजेड यांच्या राजीनाम्याने सिद्ध झाले आहे. उर्वरित सदस्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांचा समावेश झाल्याने सध्या शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.