आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार आकाश साबळे साथीदारांसह जेरबंद, जामीन रद्दनंतर पोलिसांच्या हातावर दिली होती तुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीवे मारण्याच्या प्रयत्न पीटा अंतर्गत गुन्हा दाखल असलेला फरार संशयित आकाश शर्मा ऊर्फ साबळे यास मुंबई नाका पोलिसांनी त्याच्या चार साथीदारांसह जेरबंद केले. मंगळवारी मध्यरात्री इगतपुरी येथे गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने अटकपूर्व रद्द केल्यानंतर आकाश साडेतीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता.
भारतनगरातील मैदानाची जागा खाली करण्यासाठी आकाशने रहिवाशांवर गोळीबार केला होता. घर खाली करण्यासाठी गाडी अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जानेवारीला मुंबईनाका पोलिसांत आकाश साबळे फिलोमिना शर्मा यांच्यासह चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात साबळेला अटी-शर्तीनुसार जामीन मंजूर केला होता. मात्र, साबळेकडून या अटी-शर्तीचे उल्लंघन करण्यात आल्याने न्यायालयाने अटकपूर्व रद्द केल्यानंतर साबळे फरार झाला होता. पोलिसांनी सर्वत्र शोध घेल्यानंतर आकाश इगतपुरीतील एका घरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार मधुकर घुगे, कैलास सोनवणे, संतोष जाधव, यांच्या पथकाने इगतपुरी पोलिसांच्या मदतीने घरावर छापा टाकून आकाश साबळे, राजेश राठोड, संतोष खांदेकर, राहुल सोनजे यांना अटक केली. संशयिताच्या चौकशीमध्ये गुन्हा घडल्यापासून मुंबई, पुणे, हैदराबाद, तिरुपती बालाजी, कोल्हापूर, गोवा, अजमेर अादी ठिकाणी वास्तव केल्याचे सांगितले.

अशी झाली कारवाई
आकाशसाबळे फरार झाल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. आकाशच्या चालकास ताब्यात घेतल्यानंतर मोबाइल लोकेशनच्या अाधारे संशयितांचा माग घेण्यात पथकाला यश आले.