आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त मशिदी बांधू नका, शैक्षणिक संस्थाही काढा ओवेसी यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - ‘भारतात २५ कोटी मुसलमान आहेत; पण ते विखुरलेले आअहेत. त्यामुळे काँग्रेसने फक्त या समाजाचा फायदा करून घेतला. त्यांच्यासाठी काही केले नाही,’ अशी टीका एमआयएमचे नेते खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली. ‘आता फक्त मशिदी बांधू नका, तर उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शैक्षणिक संस्था काढा. त्याशिवाय समाज प्रगत होणार नाही,’ असे आवाहनही त्यांनी केले.
मालेगावात शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत ओवेसी बोलत होते. ते म्हणाले की, मुस्लिमांत एकी नसल्याने समाजाचे नुकसान झाले. संघटित राहिले, तर त्यांचा कोणीही पराभव करू शकत नाही. मक्केत एकूण जेवढी लोकसंख्या आहे, त्यापेक्षा जास्त हा समाज भारतात विखुरलेला आहे; मतांच्या राजकारणात तो होऊ दिला नाही.
पंतप्रधान मोदी फक्त गप्पा मारतात. ते काम कधीच करत नाहीत. माझी प्रार्थना आहे की देशातील प्रत्येक चहावाल्याला दहा लाखांचा सूट परिधान करण्याची संधी मिळायला हवी,’ असा टोला त्यांनी लगावला.