आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Dams In Maharashtra Insecure, Say Sunil Tatkare

महाराष्ट्रातील सर्वच धरणे असुरक्षित, जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची कबूली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्रातील सर्वच धरणे असुरक्षित असल्याचे खुद्द जलसंपदामंत्री सुनील तटकरेंनीच मान्य केले. त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना व धोरण शासनाकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.


नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की अद्यापपर्यंत जायकवाडी वगळता एकाही प्रकल्पाच्या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने अहवाल माझ्याकडे सादर झालाच नाही. मात्र पत्रकार परिषदेपूर्वीच झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी अनेक प्रकल्प दगड-मातीचे असल्याने त्यात पाणीच साठत नसल्याची तक्रार केली. तसेच अनेकांची बांधही फुटण्याची शक्यता वर्तविली.


या संदर्भात कायद्याचा निर्णय 6 वर्षापासून प्रलंबित असून, त्यात कुठलाही निर्णय झालेला नसल्याबाबतही स्पष्ट झाले. तर सिंचन प्रकल्प सुरक्षितता समिती अध्यक्षांचे पदही प्रभारी असल्याने राज्यातील प्रकल्पांच्या बाबत शासनाची भूमीकाही यातून स्पष्ट झाली आहे.


74 टक्के पाणी सिंचनासाठी
सिंचनाच्या पाण्याची आग्रही भूमिका 60 वर्षांत प्रथम मीच मांडल्याचे तटकरेंनी सांगितले. 74 टक्के पाणी सिंचनासाठी तर उर्वरित 26 टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वापरले जात आहे. 17 टक्के पाणी पिण्यासाठीच असल्याने केवळ 9 टक्केच पाणी उद्योग वा इतर क्षेत्रासाठी वापरले जाते. त्यामुळे बिगर सिंचनासाठी अधिक पाणी वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला.