आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यापासून बँक कामकाज राहणार तीन दिवस बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील राष्ट्रीयकृत बँका उद्यापासून तीन दिवस बंद राहणार असल्याने बॅँकेच्या कामकाजाकरिता सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी बॅँकांना शिवजयंतीची सुटी असेल, तर बुधवारी आणि गुरुवारी बॅँक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी होत असल्याने बॅँका बंद राहतील. ग्राहकांनीही गैरसोय टाळण्यासाठी सोमवारीच बॅँकिंग व्यवहार करावेत, असे आवाहन बॅँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे स्टेट बॅँकेचे कामकाज सोमवारी दोन तास जास्त वेळ चालणार आहे.

चेक क्लिअरिंग आणि रक्कम बॅँकेत भरणा करणे, काढणे यासारखे व्यवहार ठप्प होणार आहेत. जिल्ह्यात 500 कोटींचे व्यवहार यामुळे ठप्प होण्याची शक्यता आहे. संपात जिल्ह्यातील बॅँक कर्मचार्‍यांच्या सर्वच संघटना सहभागी होत असून, राष्ट्रीयकृत आणि खासगी बॅँकांच्या 200 शाखांतील कामकाज ठप्प होईल. 2000पेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी होतील.

ही कामे करता येतील
एटीएम मशिन्सव्दारेच पैसे काढता येतील.
क्रेडिट आणि डेबिट कार्डव्दारेच व्यवहार करता येतील.
ऑनलाइन दुसर्‍या खात्यात रक्कम ट्रान्सफर करता येईल.

अडीच दिवसच कामकाज
सोमवार ते शनिवार या आठवड्यात केवळ अडीच दिवस कामकाज बॅँकांत होणार आहे. मंगळवारची शिवजयंतीची सुटी, बुधवार आणि गुरुवारचा संप, शनिवारचे अर्धा दिवस कामकाज यामुळे ही स्थिती आहे.

या आहेत मागण्या
केंद्रीय र्शमिक संघटनेच्या मागण्यांना पाठिंबा देणे.
बँकांच्या खासगीकरणाच्या सरकारी धोरणाला विरोध.
अनुकंपा तत्त्वावर नोकरभरती सुरू करा.
वेतन करार तातडीने करा.
बँक विलीनीकरण धोरणाला विरोध.

200 बॅँक शाखा बंद
या संपात जिल्ह्यातील आयसीआयसीआय वगळता सर्वत सरकारी आणि खासगी बॅँकांचा सहभाग आहे. ज्या खासगी बॅँकांत कंत्राटी कामगार आहेत तेथे संभवता काम सुरू राहू शकेल. तीन दिवसात 500 कोटींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. गिरीष जहागिरदार, राज्य उपाध्यक्ष, बॅँक ऑफिसर्स असो.

स्टेट बॅँकेचे जास्त वेळ काम
तीन दिवस काम बंद राहण्याची शक्यता पाहता स्टेट बॅँकेच्या शाखांमध्ये सोमवारी दोन तास अतिरिक्त कामकाज होणार आहे. ज्या शाखा सकाळी 10.30 वाजता उघडतात, त्या सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. आर्थिक देवाण-घेवाणीसह इतर बॅँकेची कामे सुरू राहतील. बाबुलाल बंब, क्षेत्रिय महाव्यवस्थापक, एसबीआय