आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All India Institute Of Medical Sciences Land For Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संस्थेसाठी प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - केंद्रसरकारच्या अखत्यारितील नेहरूनगर कामगार वसाहतीमधील मोकळ्या जागेवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संस्थेची (एआयआयएमएस) स्थापना करण्याचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी सादर केला.
केंद्र सरकारने देशातील १० राज्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची स्थापना करण्याची घोषणा २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात केली हाेती. केंद्र सरकारने राज्य शासनाला तीन ते चार जागा सूचविण्यास सांगितले होते. मात्र, तत्कालीन शासनाने जागा सूचवली नसल्याचे उघड झाले. खासदार गोडसे यांनी नाशिक हे धार्मिक,औद्योगिक शहर असून, मुंबई-नाशिक-पुणे सुवर्ण त्रिकाेण म्हणून ओळखला जात असल्याने सदरचे "एआयआयएमएस' नाशिकलाच व्हावे, असा प्रस्ताव दिला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या संस्थेसाठी नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसच्या नेहरूनगर कामगार वसाहतीमधील अंदाजे २०० एकर पडीक जागेचा प्रस्ताव दिला. ही जागा केंद्राच्या अखत्यारीतील असल्याने भूसंपादनाचा विषय येणार नाही. तसेच, ही जागा महामार्गालगत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथील कामगारांच्या सुमारे १५०० सदनिका रिकाम्या असल्याने संस्थेच्या स्थापनेसाठी नाशिकचा विचार करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही नाशिकला या संस्थेची स्थापना होण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले.