आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Photos At Maharashtra Sadan In Delhi From Nashikite Painter

दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’ला नाशिकच्या चित्रकाराचा साज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा व स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाचे मंगळवारीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वास्तुत महाराष्ट्राचे चित्ररूपी दर्शन घडविण्याची संधी नाशिकला मिळाली आहे. नाशिकच्या शिशिर शिंदे यांच्या कुंचल्यातून उमटलेले महाराष्ट्राचे रुपडे सदनाची शान वाढवत आहे.

शिशिर यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, सण-उत्सव, प्रेक्षणीय, पौराणिक, ऐतिहासिक स्थळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे प्रसंग, महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. एकूण 150 कलाकृती या सदनात लावण्यात आल्या असून त्यांना अलंकारित पद्धतीच्या फ्रेम्सच्या साह्याने सजविण्यात आले आहे;. सदनामध्ये या कलाकृती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांच्या कक्षांमध्ये लावण्यात आल्या आहेत. या चित्रांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले आहे.