आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने केला पत्नी व तिच्या घरच्यांवर चोरीचा आरोप; गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी घरातील चांदीचे भांडी चोरी केल्याची तक्रार पतीने पोलिसांत दिली. याप्रकरणी साेमवारी (दि. २६) पत्नीसह तीच्या नातेवाईकांच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
याप्रकरणी पराग अमोलिक (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार रसिका अमोलिक, नीलेश पवार, रंजना गायकवाड, रणधीर गायकवाड (रा. एकता ग्रीनव्हिला, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी घरात ठेवलेले चांदीचे भांडे, सायरस कंपनीचे घड्याळ असा ३४ हजार रुपयांचा एेवज चोरी केल्याची तक्रार पोलिसांत दिली अाहे. 
 
पोलिसांनी संशयितांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी रसिका अमोलिक यांनी पती पराग लतीक अमोलिक, अज्जुर अमोलिक, यांच्या विरोधात चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत अर्धपोटी ठेवत शारीरिक तसेच मानसिक छळ करत मुलगी नुपूरसह घरातून हाकलून दिल्याची तक्रार इंदिरानगर पोलिसांत दिली होती. यावरून घडलेला हा प्रकार म्हणजे घरगुती भांडणाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी इंदिरानगर पोलिसांनी सांगितले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...