आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाेष प्रभागरचनेचा अाराेप, महापालिका देणार उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभागरचना सदाेष असल्याप्रकरणी जिल्हा दिवाणी न्यायालयात दाखल दाव्याबाबत महापालिकेने बाजू मांडण्याची तयारी सुरू केली असून, राज्य निवडणूक अायाेगाच्या अखत्यारीतील बाब असल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या न्यायकक्षेत दावा कसा दाखल झाला, यापासून तर प्रगणक गट गुगल मॅपवर व्यवस्थितपणे कसे दर्शवले, याबाबतचे उत्तरही दिले जाणार असल्याचे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असून, १२२ जागांसाठी ३१ प्रभाग करण्यात अाले अाहेत. चार सदस्यीय प्रभागरचनेबाबतचे अाक्षेप २५ अाॅक्टाेबरपर्यंत जाणून घेत त्यावरील हरकतीवर सुनावणी करून २५ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक अायाेगाने अंतिम प्रभागरचना जाहीर केली. त्यानंतर हर्षल जाधव यांनी प्रभागरचना करताना राज्य निवडणूक अायाेगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा दावा दाखल केला. प्रामुख्याने गुगल मॅपवर प्रगणक गट ठळकपणे दिसतील अशा निर्देशांचा भंग झाल्याचा जाधव यांचा दावा हाेता. २० अाॅगस्ट २०१६ राेजी राज्य निवडणूक अायाेगाने पत्र पाठवून महापालिकेला स्पष्टपणे गुगल मॅपवर प्रगणक गट दिसतील अशी दक्षता घेण्याचे अादेश देऊनही दुर्लक्ष झाल्याचाही युक्तिवाद हाेता. जाधव यांच्या वतीने अॅड. नागनाथ गाेरवाडकर यांनी युक्तिवाद केल्यानंतर जिल्हा दिवाणी न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्याचे अादेश देत या प्रकरणी डिसेंबर राेजी प्रतिवादी असलेल्या राज्य निवडणूक अायाेग, विभागीय अायुक्त, महापालिका अायुक्त जिल्हाधिकाऱ्यांना बाजू मांडण्यासाठी पाचारण केले. त्यानुसार महापालिकेने बाजू मांडण्याची तयारी केली अाहे. त्याबाबत अायुक्तांनी सांगितले की, प्रामुख्याने सर्वप्रथम राज्य निवडणूक अायाेगाच्या अखत्यारीतील बाब असल्यामुळे न्यायकक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केला जाणार अाहे. गुगल मॅपवर प्रगणक गट ठळकपणे दिसत असून, ही बाब प्रशासकीय असल्यामुळे त्याची माहिती बाह्य व्यक्तींना असणार नाही. प्रथमत: या बाजू न्यायालयासमाेर मांडल्या जाणार असून, त्यानंतर पुढील युक्तिवाद हाेईल.

प्रशासन उपायुक्त अायाेगाकडे
जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या अादेशाची माहिती देण्यासाठी उपायुक्त विजय पगार हे मंगळवारी सकाळीच राज्य निवडणूक अायाेगाकडे रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार निवडणूक अायाेगातील उच्चपदस्थांशी चर्चा करून यासंदर्भात डिसेंबर राेजी काय उत्तर द्यायचे, याबाबत चर्चा करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...