आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेकणच्या राजाचा महागाईशी 'झिम्मा', हापूस यंदा पाेहोचला ७०० ते हजार रुपयांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - 'अांब्यात अांबा हापूस, सावरीचा सुंदर कापूस' अशी अाेळख असलेला मधुर हापूस अांबा यंदा नाशिककरांना जरा जपूनच खावा लागणार अाहे. काेकणात झालेल्या अवकाळी पावसाने या अांब्याची अावक घटवली, परिणामत: त्याची किंमत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाली अाहे. गेल्या वेळी नाशिकमध्ये झालेल्या आंबा महाेत्सवात २०० ते ५०० रुपये डझन अशी विक्री झाली हाेती. यंदा त्याची विक्री ७०० ते १००० हजार रुपये दराने हाेणार असल्याची माहिती अांबा महाेत्सवाच्या संयाेजकांनी दिली. शिवाय, महाेत्सवात यंदा अांब्यांचे प्रमाणही कमी असेल, असेही त्यांनी सांगितले.
कोकणातला हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. आंबा खावा तर तो हापूसच. फळांचा राजा आणि राष्ट्रीय फळ म्हणून दर्जा असणाऱ्या आंब्याचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. त्यात रसाळ, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा आणि साखरेप्रमाणे गोड गर, टवटवीत पिवळसर आणि नारंगी रंग या वैशिष्ट्यांनीयुक्त असणाऱ्या काेकणातल्या हापूस आंब्याला तर सर्वाधिक पसंती असते. विशेषत: हा काेकणच्या राजा नाशिककरांच्या दिमतीला कधी येताे, याची प्रतीक्षा सर्वांनाच असते.
यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तसेच गारपिटीने अांब्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अतिशय त्राेटक स्वरूपातील हापूस नाशिकमध्ये विक्रीसाठी उपलब्ध हाेणार अाहे. यातही काही प्रयाेगशील शेतकऱ्यांनी अशा विपरीत परिस्थितीत अांब्याचे पीक वाचविण्याचा प्रयत्न केल्यानेच हा अांबा बाजारात दाखल हाेणार अाहे. यंदा अांबा उत्पादनात माेठी घट येण्याची शक्यता असल्याने परिणामी बाजारात अांब्याची अावकही घटणार अाहे. त्यामुळे अांबा महागणार अाहे. अांबामहाेत्सव शनिवारपासून :काेकण पर्यटन विकास संस्थेच्या वतीने शनिवारी ( दि. १८) सीबीएस येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात अांबा महाेत्सवाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. महाेत्सवाचे उद‌्घाटन अामदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते उद्याेगपती राधाकिसन चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेणार अाहे.
यंदा ४० लाखांची उलाढालही पुरेशी
गेल्यावर्षी अांबा महाेत्सवात सुमारे एक काेटींपर्यंतची उलाढाल झाली हाेती. यंदा काेकणात झालेल्या पावसामुळे अांब्याची अावक घटली अाहे. त्यामुळे यंदा ३० ते ४० लाखांची उलाढाल झाली तरीही अाम्ही समाधानी असू.
दत्ता भालेराव, संचालक, अांबा महाेत्सव