आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये साकारणार अल्झायमर मार्गदर्शन सेंटर;सेंटर उभारणीबाबत उद्या होणार बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मेंदूशीनिगडित असलेल्या अल्झायमर, डिमेन्शिया यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, भारतही त्याला अपवाद राहिलेला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकणा-या या आजाराबाबत मार्गदर्शन होण्‍यासाठी शहरात अल्झायमर सेंटर उभारले जाणार आहे. समाजातील सर्व घटकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याकरिता रविवारी (दि. ७) बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ डॉ. मंगल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. कर्डिले म्हणाले की, या दोन्ही आजारांत मेंदूतील सक्षम पेशींचा -हास झाल्याने दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र, या आजाराबाबत मार्गदर्शन होत नसल्याने हा आजार अगदी अंतिम टप्प्यात गेल्यावर रुग्ण डॉक्टरकडे धाव घेतात. जागतिक आरोग्‍य संघटनेच्या अहवालानुसार, भारताच्या सध्याच्या 125 कोटी लोकसंख्येपैकी दहा कोटींहून अधिक लोकांना २०२० सालापर्यंत अल्झायमर, डिमेन्शिया असे विकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आज वृद्धाश्रम असले तरी तेथे या सुविधा उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधत कर्डिले यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. राहुल बाविस्कर, डॉ. अनंत पाटील यांच्यासह काम करीत असल्याचे सांगितले.
केंद्राच्याउभारणीसाठी या पुढे : याकेंद्राच्या उभारणीसाठी शहरात जागेची उपलब्धतेसह विविध स्वरूपाच्या अनेक गरजा असून, त्याकरिता विविध पॅथीचे डॉक्टर्स, समाजसेवक, उद्योजक यांसारख्या जबाबदार समाजघटकांनी पुढे येण्याची गरज असून, त्यांनी या बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन कर्डिले यांनी केले आहे. डॉ. राहुल बाविस्कर, यांच्या पंडित कॉलनीतील क्लिनिकमध्ये दुपारी वाजता ही बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात उभारण्यात येणा-या या केंद्रासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे येण्याची गरज असून, आगामी काळातील रुग्णांची संख्या लक्षात घेता अशा केंद्राची गरज आहे.
या आजाराने होते काय?
अल्झायमर्सिकंवा डिमेन्शियापीडित लोकांची स्मरणशक्ती कमी होते जाते. परिणामी, ते घरच्यांवरच अवलंबून असतात. त्यांची विशेष काळजी कुटुंबीयांना घ्यावी लागते. तणाव हे या आजारामागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट करतानाच मेंदूचे काही व्यायाम या आजारापासून बचावासाठी किंवा आजार झाल्यावर उपचारांसाठी लाभदायी ठरतात. घरच्यांचेही उद‌्बोधन त्यासाठी ति‍तकेच गरजेचे ठरते. अशाप्रकारच्या उद‌्बोधनातून या अाजाराच्या रुग्णांची चांगल्याप्रकारे काळजी घेता येते.