आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरडी काेसळल्याने नाशिकचे भाविक काश्मिरात अडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - काश्मीर घाटीत बाबा अमरनाथ यात्रेला गेलेले नाशिकचे अनेक भाविक गेल्या ४८ तासांपासून काश्मीर-जम्मू महामार्गावर अडकून पडले अाहेत. संततधार पावसामुळे दरडी कोसळल्याने हा महामार्ग बंद असून तो खुला हाेण्यासाठी दाेन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता लष्काराच्या सूत्रांनी व्यक्त केली.

लष्कराच्या छावण्यांत अडकून पडलेल्या भाविकांची राहण्याची व लंगरमध्ये भाेजनाची व्यवस्था करण्यात आली अाहे. नाशिकराेड, चेहडी, शिंदे, पळसे आदी ठिकाणचे महिला, पुरुष व लहान मुले असे सुमारे ५० पेक्षा अधिक भाविक दाेन लक्झरी बसने अमरनाथ यात्रेला गेले अाहेत. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी काश्मीरमधून १६० किमी परतीच्या प्रवासावर असताना घाटात सात ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे वाहतूक बंद झाली आहे.

बसचा पर्याय निवडला पण..
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी २६ जूनचे जम्मू-तावी एक्सप्रेसचे अनेकांनी अारक्षण केले हाेते. मात्र इटारसीला सिग्नल पॅनल केबिन जळाल्याने गाडी रद्द झाली आणि भाविकांनी लक्झरी बसचा पर्याय निवडला.अमरनाथाचे दर्शन झाले मात्र आता दरडी कोसळल्याने आम्ही अडकून पडलो आहोत.
राजेश ताजनपुरे भाविक,नाशिकराेड

काहीच सांगता येणार नाही

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मूकडे जाताना कटरापर्यंतचा अवघ्या १२० किमी तर जम्मूपर्यंतचा १४० किमीचा प्रवास शिल्लक असतांना पाऊस व दरडी काेसळल्याने महामार्ग बंद झाला. लष्कराने जम्मू-काश्मिरकडे जाणारी सर्व वाहने थांबवली आहेत. ही वाहने कधी सुटतील आताच सांगता येणार नाही.
दुर्गेश एखंडे, बसचालक,जेलराेड