आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्रातील 100 यात्रेकरू लष्कराच्या बंदाेबस्तात अमरनाथाच्या दिशेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -जम्मू-काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर श्री अमरनाथ यात्रा अर्धवट सोडून परतावे लागणार या कल्पनेने नाराज झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १०० भाविकांना थेट संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना केलेल्या फोनमुळे अमरनाथ दर्शनयोग जुळून आला.
अमरनाथाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या या भाविकांनी जम्मू ओलांडले होते. परंतु काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना दर्शन न घेताच जम्मूकडे परतावे लागले. माघारी परतणे भाविकांना पटेना. म्हणून त्यांच्यातील काही जणांनी थेट संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना फोन केला. भामरे यांनीही तत्काळ दखल घेत संबंधितांना सूचना केल्या आणि दोन तासांतच लष्कराचे अधिकारी भाविकांपर्यंत पोहाेचले. भाविकांना मदत छावणीत नेऊन या अधिकाऱ्यांनी भाविकांची सोय केली. या भाविकांमध्ये मालेगाव तालुक्यातील पाच अाणि धुळे, जळगाव, भुसावळमधील १०० जणांचा समावेश अाहे. यापैकी वाके (ता. मालेगाव) येथील शिक्षक पुंडलिक कानडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेली माहिती त्यांच्याच शब्दांत...
गेल्या शुक्रवारी (दि. ८) अाम्ही खासगी गाडीने यात्रेला मार्गस्थ झालाे होतो. रात्री पहेलगामजवळ अामच्या गाडीवर दगडफेक झाली. पाेलिसांच्या मदतीमुळे आम्ही बचावलाे. अामच्या डाेळ्यादेखत जमावाकडून हाेणारी जाळपाेळ, दगडफेक, गाेळीबार समोर दिसत होता. तिथून कसेबसे एका धर्मशाळेपर्यंत पाेहाेचलाे. मात्र, दाेन दिवस बाहेर पडता येत नसल्याने काेणाशी संर्पकही हाेत नव्हता. अखेर रविवारी रात्री संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे अामच्या धुळे मतदारसंघातील खासदार असल्याने त्यांच्याशी माेबाइलवर संपर्क साधला. डाॅ. भामरे यांनी अामची विचारपूस केली. आम्हाला ठिकाणही सांगता येत नव्हते, आम्ही माेबाइल क्रमांक दिला. त्यांनी मदतीचे अाश्वासन दिले. दाेन तासांतच लष्कराचे अधिकारी अामची चाैकशी करत पाेहाेचले. आम्हाला लष्कराच्या मदत छावणीत नेण्यात आले. अमरनाथ यात्रा तूर्त स्थगित झाल्याची माहिती मिळाल्याने अाम्हाला अनंतनागहून लष्कराच्या बसमधून साेमवारी पहाटे जम्मूत नेण्यात आले. तिथे अमरनाथा यात्रा पुन्हा सुरू झाल्याचे कळले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही भाविकांना यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत विचारणा केली. सर्व भाविकांनी एका सुरात होकारही दिला.
त्यानुसार लष्कराने अामच्या संरक्षणार्थ जवानांचा एक ताफाच दिला. १४ ते १६ माेठ्या बसेसमधून सोमवारी रात्री आम्ही जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने निघालो अाहोत. जवानांच्या बंदाेबस्तातच श्रीनगर मार्गे बालटाल व तिथून थेट अमरनाथ यात्रेला सुरूवात हाेणार आहे. सागर बच्छाव, विनाेद पाटील, अक्षय बच्छाव ही मंडळी माझ्यासोबतच आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय म्‍हणाले संरक्षण राज्‍यमंत्री..
बातम्या आणखी आहेत...