आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड औद्योगिक वसाहतीत विनापरवानगी वृक्षतोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अंबड औद्योगिक वसाहतीतील सी-41 या भूखंडावर शनिवारी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याची बाब समोर आली आहे. जागरूक उद्योजकांनीच एकत्र येत हा प्रकार उघडकीस आणला आणि महापालिकेच्या अधिका-यांना याबाबतची माहिती कळविली.
दरम्यान, महापालिकेच्या अधिका-यांनीही वृक्षतोडीबाबत कोणतीच परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले असून, आता संबंधितांवर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागून आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील ‘सी’ सेक्टरमधील कृष्णा इंडस्ट्रीजसमोरील प्‍लॉट क्रमांक 41 या मोकळ्या भूखंडावर वीस वर्षांपेक्षाही जास्त वयाचे विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. मात्र, शनिवारी औद्योगिक वसाहतींना साप्ताहिक सुटी असल्याची संधी साधत काही लोकांनी या भूखंडावर प्रवेश करून वृक्षतोड सुरू केली. हा संशयास्पद प्रकार बघून परिसरातील काही उद्योजकांनी एकत्र येऊन महापालिका अधिका-यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर महापालिकेचे अधिकारीही येथे आले पंचनामा केला गेला. मात्र, संबंधितांवर काय कारवाई केली जाणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा भूखंड कोणाला देण्यात आला, याबाबत उद्योजकांकडून उलटसुलट चर्चा दिवसभर सुरू होती.
कठोरकारवाई व्हावी
मोकळ्याभूखंडांवरील वीस-तीस वर्षांच्या आसपास या वृक्षांचे वय असताना विनापरवानगी ते कसे काय ताेडले जाऊ शकतात, असा प्रश्न आहे, महापालिकेने या प्रकरणी कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रदीपपेशकार, भाजप उद्योग आघाडी