आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात गाजावाजा, भीमराव एकच राजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- 'ज्याचारुबाब राजेशाही, सुटाबुटात राेजच राही... जगात गाजावाजा, भीमराव एकच राजा' या गीतावर डीजेच्या तालावर बेभान नृत्य करीत हजाराे भीमसैनिकांच्या साक्षीने नाशिकराेडला डाॅ. अांबेडकर जयंती उत्सवाची मिरवणूक उत्साहात पार पडली.

डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त नाशिकराेड पाेलिस ठाण्यासमाेरून पाेलिस उपायुक्त विजय पाटील, सहायक अायुक्त अतुल झेंडे, उत्सव समिती अध्यक्ष विलासराज गायकवाड, विजया जाधव यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवाजी पुतळा, बुद्धविहार, डाॅ. अांबेडकर पुतळामार्गे सुभाषराेड या मार्गावरून मिरवणूक काढण्यात अाली.
या मिरवणुकीला यंदा शहर परिसरातून भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी निघालेल्या मिरवणुकीत विक्रमी ३५पेक्षा अधिक चित्ररथ सहभागी झाले हाेते. अग्रस्थानी विलासराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक समितीचा चित्ररथ हाेता.
मिरवणुकीतील अादिवासी नृत्याने भीमसैनिकांची मने जिंकली. मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बालगाेपाळ, महिला, वृद्धांसह हजाराे भीमसैनिकांनी गर्दी केली हाेती.
विक्रमीचित्ररथ : मिरवणुकीतशिवसेनाप्रणीत अजिंक्य मित्रमंडळ, पंचशील मित्रमंडळ, अाम्रपाली मित्रमंडळ, राहुल मित्रमंडळ, गाैतमनगर मित्रमंडळ, सम्राट मित्रमंडळ, अातषबाजी मित्रमंडळ, अादर्श नवरंग फ्रेंड सर्कल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यूथ फाेर्स, निर्मिक फाउंडेशन, बुद्धविहार फ्रेंड सर्कल, प्रबुद्ध मित्रमंडळ, इंदिरानगर अाम्रपाली मित्रमंडळ, धम्मरत्न तरुण मित्रमंडळ, सार्वजनिक सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, भारतभूषण फ्रेंड सर्कल, वाय. पी. फ्रेंड सर्कल, सिद्धार्थ एकता मित्रमंडळ, संघामित्रा फ्रेंड सर्कल, सार्वजनिक उत्सव समिती, संघामित्रा महिला मंडळ, सम्राट मित्रमंडळ, भीमगर्जना मित्रमंडळ, गाेरेवाडी मित्र परिवार, मिलन मित्रमंडळ, उड्डाणपूल भाजीविक्रेता, सुभाषराेड तरुण मित्रमंडळ, रिपाइं अाठवले गट, रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया, प्रज्ञाशील करुणा मित्रमंडळाच्या चित्ररथांचा समावेश हाेता. डीजे, एलईडी लाइट्सच्या प्रकाशझाेतात भीमसैनिकांनी बेफाम नृत्य केले.

ताेफांची सलामी
शिवाजीपुतळा येथे विश्वरत्न सार्वजनिक उत्सव समिती सुनील संपत कांबळे, देवीदास दिवेकर, अतुल भावसार यांच्या वतीने चित्ररथांचे स्वागत १०१ ताेफांची सलामी देण्यात अाली, तर डाॅ. अांबेडकर यांच्या पुतळ्यासमाेर अध्यक्ष विलासराज गायकवाड, सुनील वाघ, भारत निकम, दिलीप दासवाणी, रामबाबा पठारे यांच्या वतीने १२१ ताेफांची सलामी देण्यात अाली.

चवदार तळ्याचे पाणी वाटप
राष्ट्रवादीकाँग्रेसचे रवींद्र पाटील यांनी अाणलेले चवदार तळ्याचे फिल्टर केलेले पाणी मिरवणुकीत सहभागी भीमसैनिकांना वाटप करण्यात अाले. मार्गावर मनसे, बाेधिसत्त्व सामाजिक संस्था, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, अारपीअाय गवई गट, दलित विकास महासंघाच्या वतीने चित्ररथ भीमसैनिकांचे स्वागत करण्यात अाले.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी नाशिकरोड येथे शिवसेनेतर्फे पुतळा पूजनप्रसंगी उपस्थित खासदार हेमंत गोडसे, संजय भालेराव, नितीन चिडे, बाबा बच्छाव आदी.
पुढील स्लईडवर पाहा इतर छायाचित्रे..