आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याग आणि समर्पणातून आंबेडकर चळवळ झाली समृद्ध डॉ. ऋषिकेश कांबळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कविता, शाहिरी आणि भीमगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आले. भीमोत्सवाच्या या योगदानातूनच आंबेडकर चळवळ समृद्ध होत गेल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले.
 
गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात ब्ल्यू लायन फाउंडेशनतर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय भीमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आैरंगाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. कांबळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोणतीही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण महत्त्वाचा असतो. यावेळी विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांच्या बाजार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
 
या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीत कवितेचे आणि शाहिरीचे योगदान या विषयावर कविसंमेलन, विद्रोही शाहिरी जलसा नवकवींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर अहिरे हे होते. या वेळी कवी अविनाश गायकवाड, प्रा. अशोककुमार दवणे, डॉ. मधुकर साळवे, कवी संजय बनसोडे, प्रमोद पवार, कैलास दाभाडे, नंदकिशोर साळवे, नानासाहेब पटाईत, नितीन भुजबळ, तुषार दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
ब्ल्यू लायन फाउंडेशनच्या वतीने आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय भीमोत्सव कार्यक्रमाप्रसंगी विद्रोही कवी बुद्धभूषण साळवे यांच्या ‘बाजार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. गंगाधर अहिरे, अविनाश गायकवाड, अशोककुमार दवणे, मधुकर साळवे आदी. 
बातम्या आणखी आहेत...