आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambulance Went On Strike Thats Why Patients Very Misery

रुग्णवाहिका संपाने रुग्णांचे हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा रुग्णालयासमोरील जनसेवा अँम्ब्युलन्स संस्थेच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जनसेवा संस्थेच्या चालकांनी संपाची हाक दिली होती.

यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले, तसेच पालिकेच्या शववाहिकेतून चार-चार मृतदेह नेण्याची वेळ आली होती. दरम्यान, शनिवारी (दि.4) राजीव गांधी भवन येथे रुग्णवाहिका उभ्या करून त्यांच्या चाव्या आयुक्तांकडे देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संस्थेचे टपरीवजा कार्यालय पालिकेने जमीनदोस्त केले होते. संस्थेला याच ठिकाणी पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी संस्थेने शुक्रवारी संप पुकारला होता. या संपाचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर काही प्रमाणात झाला.