आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन निवडणुकीत ‘अमेरिकन पॅटर्न’चाही पर्याय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चालू शैक्षणिक वर्षापासूनच महाविद्यालयीन निवडणुका हाेणार असल्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी स्पष्ट केले अाहे. त्यानुसार अाता या निवडणुका नेमक्या कशा पध्दतीने घेण्यात याव्यात याविषयी पर्यायांची चाचपणी सुरु झाली अाहे. त्यात पारंपरिक मतदान पद्धतीसह एसएमएस पध्दत वा अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या धर्तीवर निवडणूक घेण्याचाही विचार केला जात अाहे.

गुन्हेगारी वर्तन वाढीस लागल्याचे कारण दर्शवित १९९४ पासून महाविद्यालयीन निवडणुका बंद करण्यात अाल्या हाेत्या. मात्र कालांतराने विद्यापीठ अनुदान आयोगाने लिंगडोह कमिटीच्या शिफारसीनुसार या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्याचा अध्यादेश २०१४ साली काढला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नव्याने करण्यात येत असून त्यास येत्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी घेण्यात येणार अाहे. याच कायद्यात महाविद्यालयीन निवडणुकीची तरतुद करण्यात अाली अाहे. या निवडणुका कशा पध्दतीने घ्याव्यात या विषयी अाता विचारमंथन सुरु अाहे.

पारंपरिक चिठ्ठी पद्धती
यापूर्वी मतपेटीत चिठ्ठी टाकून गुप्त पध्दतीने मतदान हाेत हाेते. हीच पध्दती अवलंबावी का याचाही विचार सुरु अाहे. यात एका वर्गात मतपेट्या ठेवल्या जातील. तेथे महापालिका वा अन्य निवडणुकांमध्ये केले जाते तसे मतदान केले जाईल. विद्यार्थ्यांनी अापल्या अावडीच्या उमेदवाराचे नाव चिठ्ठीवर टाकून ती चिठ्ठी मतपेटीत टाकावी. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतील ताे निवडून अाल्याचे घाेषित करण्यात येईल.

अमेरिकन पद्धत
अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक पद्धतीचाही विचार हाेत अाहे. महाविद्यालयाच्या अावारात संबंधित महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी जमा हाेतील त्यांच्यासमाेर विद्यार्थी उमेदवार उभे राहतील. तेथे विद्यार्थी उमेदवाराने अापल्याला का निवडून द्यावे, या विषयी मत प्रदर्शित करावयाचे असेल. उपस्थित विद्यार्थ्यांनीही त्या उमेदवाराला प्रातिनिधीक पाच - पाच प्रश्न विचारायचे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खुले वा गुप्त मतदान करुन संबंधितांपैकी एकाला निवडून द्यावे.

एसएमएस पद्धत
महाविद्यालयीन निवडणुका एसएमएस पध्दतीने घेण्याचा सध्या विचार सुरु अाहे. महाविद्यालयांतील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे माेबाइल असल्याचे गृहित धरुन या पद्धतीवर जाेर दिला जात अाहे. विद्यार्थी एसएमएसद्वारे मतदान करतील अाणि त्यातून ‘जीएस’ची निवड करण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्याच्या माेबाइल क्रमांकाची पूर्वनाेंदणी करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाइलला कोड देण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा हा या याेजनेमागचा उद्देश असेल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...