आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir Khan News In Marathi, Divya Marathi, PK, Bollywood

गळ्यात ७८६, एक ओंकारचे लॉकेट; आमिरच्या हातावर तावीज आणि तोंडी मराठी बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गळ्यात ७८६ चे मोठे लॉकेट, त्याच्याच बाजूला एक ओमकारचे चिन्ह असलेले दुसरे लॉकेट आणि डाव्या हाताच्या दंडावर सात-आठ तावीज शर्टच्या बाहेरून बांधलेले असा आमिरचा वेश नक्कीच पाहणा-यांची उत्कंठा वाढवणारा ठरला. नाशकातील रामकुंडावर सोमवारी पी.के चित्रपटाचे चित्रीकरण झाले. या वेळी आमिरचा एकूणच सर्वधर्मसमभाव दर्शवणारा अवतार खरोखरच अनोखा होता.
शूटिंगपूर्वी झालेल्या काळारामदर्शन आणि सत्कार सोहळ्याप्रसंगी त्याच्या तोंडून निघालेले मराठी बोल उपस्थितांची दाद मिळवून गेले. पी.के.च्या माध्यमातून धार्मिक एकात्मतेचाच संदेश देण्याचा उद्देश असल्यासारखा आमिरचा वेश होता. त्यात त्याचे ते सर्वपरिचित मिश्कील हास्य त्याच्या जवळ पोहोचू शकलेल्या प्रत्येकाच्याच मनात गुदगुल्या करून जात होते.

रामकुंड, नारोशंकर मंदिर
काळाराम मंदिरातील शॉट ओके झाल्यानंतर आमिर खान दक्षिण दरवाजाने हळूच बाहेर पडत त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून लंचसाठी रवाना झाला. त्यानंतर शूटिंगचे सर्व साहित्य गुंडाळत शूटिंगच्या प्रत्येक मेंबरने नारोशंकर मंदिराकडे प्रयाण केले. तिथे सर्व यंत्रणा पुन्हा सज्ज होण्यासाठी तीन वाजून गेले. त्यानंतर पुन्हा आमिर खानचे आगमन झाले. तिथे मंदिर परिसरात चित्रण उरकून काही क्षण रामकुंडावरदेखील शूट केल्यानंतर सगळे युनिट घोटी रोडवरील चित्रीकरणासाठी मार्गस्थ झाले.

पुढे वाचा.... १० सेकंदांसाठी २ तास