आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीत ‘पीके’चा सेट मोडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चित्रीकरणासाठी परिसरात आलेल्या अभिनेता आमिर खानला बघण्यासाठी नाशिककरांनी दुसऱ्या दिवशीही गर्दी केली. त्यातच पोलिस आयुक्तालयाकडून शूटिंगसाठी देण्यात आलेला बंदोबस्त गर्दीपुढे कमी पडल्याने गंगाघाटावर गोंधळ उडाला. त्यात सेटचीही मोडतोड झाली. शेवटी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आल्यानंतर पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’ या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात सुरू आहे. या चित्रिकरणासाठी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त देण्यात आला होता. मात्र अभिनेता अमिर खान प्रथमच नाशकात येत असल्याने त्यास बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. मंगळवारी सकाळी पिंडीवर दुग्धाभिषेक करण्याचा एक प्रसंग चित्रित करण्यात येणार होता. हा शॉट ओके होण्याकरीता सुमारे दीड तासाचा अवधी लागला. भर उन्हात शर्ट न घालता हा शॉट चित्रित करण्यात येत होता. तो काही मनसारखा होत नसल्याने अमिर खानही वैतागला आणि थेट एसी गाडी जाऊन बसला.

प्रेक्षक धावले; सेट खराब
चित्रिकरण पूर्ण झाल्याचे समजताच नागरिकांनी गोंधळ करत चित्रिकरणाच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांच्या गोंधळात पूर्ण सेट खराब झाल्याने दिग्दर्शक िहरानी संतप्त झाले. पोलिस अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी नागरिकांना आवरण्याची िवनंती केली. मात्र प्रचंड गर्दीपुढे पोलिस बंदोबस्त अपुरा पडला. अखेर अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दीला िनयंत्रणात आणले.