आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वायुपुत्र’कार अमिष त्रिपाठींशी गप्पांची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दीपोत्सवापाठोपाठ येत्या ११, १२ व १३ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या ‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’ची बहारदार सांस्कृतिक मेजवानी ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून साहित्य रसिकांना मिळणार आहे.

मराठी साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील विविध दिग्गजांसह भारतीय प्रकाशनविश्वात सर्वात जलद पुस्तक खपाचा विक्रम नोंदविणाऱ्या अमिष त्रिपाठी यांच्यासारख्या नावाजलेल्या लेखकांशी संवादाची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा सक्रिय सहभाग असून, राजहंस प्रकाशन ‘नॉलेज पार्टनर’ असेल. एबीपी माझा, वेस्टलँड, वाणी प्रकाशन आणि एक्स्प्रेस इनच्या सहयोगाने होणाऱ्या महोत्सवात मराठीसह हिंदी, इंग्रजीतील नामवंत लेखक, दिग्दर्शक व कलाकारांची मांदियाळी असेल.
बातम्या आणखी आहेत...