आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाखाड्यांचे ‘शाही’ ध्वजाराेहण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नाशिकच्या साधुग्राममधील अाखाड्यांच्या ध्वजाराेहणासाठी येणार अाहेत. विशेष म्हणजे, १९ अाॅगस्टला हाेणाऱ्या या साेहळ्यासाठी ते अादल्या दिवशीच शहरात दाखल हाेणार अाहेेत. निर्वाणी अाखाड्यातच त्यांचा मुक्काम राहणार असल्याने त्यांच्या दृष्टीने सुयाेग्य शामियाना उभारणीसही रविवारपासून प्रारंभ झाला अाहे.
भाजपचे ‘फायरब्रँड हिंदुत्ववादी नेते’ म्हणून परिचित असलेले अमित शहा हे पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नाशिकला येत अाहेत. नाशिक - त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा सध्या विविध कारणांनी गाजू लागल्याच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या नाशिक दाैऱ्याने नाशिक कुंभमेळ्याला विशेष संदर्भ प्राप्त हाेणार अाहेत.

साधूंसाठीखऱ्या अर्थाने कुंभपर्वारंभ
नाशिकमध्येअसलेल्या तिन्ही अाखाड्यांमध्ये मिळून १९ अाॅगस्टला सकाळी ध्वजाराेहण करण्यात येणार अाहे. नाशकात पुराेहित संघ अाणि नाशिक महापालिकेच्या वतीने रामकुंडावर १४ जुलैला ध्वजाराेहण झाले असले तरी साधुग्राममध्ये हाेणाऱ्या ध्वजाराेहणाला साधूंच्या दृष्टीने विशेष महत्त्व अाहे. कारण या ध्वजाराेहणानंतरच त्यांच्या लेखी खऱ्या कुंभपर्वाचा शुभारंभ हाेताे.

महंत ग्यानदास यांच्यासाठी उभारण्यात येत असलेल्या मंडपातच अमित शहादेखील करणार अाहेत मुक्काम.

साधुग्राममधील ध्वजाराेहण बनला प्रतिष्ठेचा विषय
रामकुंडावर झालेल्या ध्वजाराेहण साेहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील तीन, तर केंद्रातील एक मंत्रीदेखील उपस्थित हाेते. त्यामुळे साधुग्राममध्ये हाेणारे ध्वजाराेहणदेखील तितकेच ताेलामाेलाचे व्हावे, या दृष्टीने हा विषय अाता अाखाड्यांकडून प्रतिष्ठेचा बनवण्यात अाला अाहे.
भाजपविराेधाची धार बाेथट करण्याचा प्रयत्न
केंद्रातभाजप सरकार अाल्यापासून साधुजगताला त्यांच्यापासून अनेक विषयांबाबत अपेक्षा हाेत्या. मात्र, त्या दृष्टीने अद्याप तरी केंद्राने पावले उचलली नसल्याने साधूंच्या विश्वात भाजपविराेधाची धार येत असल्याचे गत काही महिन्यांपासून दिसू लागले अाहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्षांची अाखाड्यांच्या ध्वजाराेहणास उपस्थिती ही भाजपविराेधाची धार बाेथट करण्याच्या प्रयत्नांंचा भाग असण्याचीही शक्यता वर्तविली जात अाहे.

शहा करणार निर्वाणी अाखाड्यात मुक्काम
शहाहे दि. १८ अाॅगस्टला सायंकाळी ५.३० वाजता नाशकात येणार अाहेत. त्यानंतर ते दिगंबर अनी, निर्वाणी अनी, निर्माेही अनी या तिन्ही अाखाड्यांच्या श्री महंत अाचार्यांची भेट घेतील. १९ अाॅगस्टला सकाळी हाेणाऱ्या ध्वजाराेहण साेहळ्यास उपस्थित राहून नंतर ते दिल्लीकडे प्रयाण करतील, असे नियाेजन असेल. मात्र, या दाैऱ्याविषयी प्रशासनाकडून अधिकृत दुजाेरा मिळालेला नाही.