आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारच्या निधीबाबत अमित शहा यांचे तोंडावर बोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वैष्णवपंथीय दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही आखाड्यांचा ध्वजारोहण समारंभ बुधवारी दिमाखदार झाला खरा; परंतु त्यात चर्चेचा विषय ठरला तो केंद्र सरकारकडून कुंभमेळ्यासाठी आलेला निधी. महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह माजीमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमित शहा यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे जाहीरपणे मांडल्यानंतरही शहा यांनी या विषयाला स्पर्श करण्याची भूमिका घेतली. अखेर मुख्यमंत्र्यांनीच केंद्र सरकारची वकिली करीत कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार पैशांची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत नाशिककरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

बारा वर्षांनंतर आलेला कुंभमेळा, माध्यमांमुळे त्याची सातासमुद्रापार पोहचलेली ख्याती, सिंहस्थानिमित्त शहराचा झालेला कायापालट, साधू-महंतांमधील वाद, राजकीय डावपेच नेत्रदीपक सोहळे या बाबींमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या कुंभमेळ्याला धार्मिक दृष्टीने खऱ्या अर्थाने बुधवारपासून सुरुवात झाली. नाशिकमधील तिन्ही अाखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी आलेले अमित शहा हे केंद्राच्या निधीबाबत नक्कीच काही महत्त्वपूर्ण घोषणा करतील, अशी आस लावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात निधीच्या अनुपलब्धतेचा मुद्दा प्रकर्षाने छेडला.

राजकीय पदाधिकाऱ्यांसह महंत ग्यानदास महाराजांनीही केंद्राने विशेष निधी देण्याची अाग्रही मागणी केली. परंतु, या मागणीला स्पर्शही करत शहा यांनी भाषणात कुंभमेळ्याचे महत्त्व विशद केले. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांच्या भावना जाणून घेत चलाखीने
महापौरांच्या निवेदनाला प्रत्युत्तर दिले.
केंद्राकडून मिळणाऱ्या निधीच्या विषयाला बगल देत मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी आपण गेलोअसता, त्यांनी नाशिकमध्ये येणारे साधू-संत आणि भाविक समाधानाने परत जातील याची काळजी घ्या, असा सल्ला दिल्याचा आवर्जून उल्लेख केला.

चमत्कारी अमितभाई निधी मिळवून देतील
अमितजोग प्रकटही काला, जथा जोग मिले सबही कृपाला.. याप्रमाणे अमितभाई हे चमत्कारी आहेत. महापाैरांनी सांगितल्यानुसार बराच निधी कुंभमेळ्यासाठी खर्च झाल्याने पालिकेला केंद्राचा निधी अमितभाई मिळवून देतील. महंतग्यानदास महाराज

लागेल तितका पैसा देऊ
^महापौरमुर्तडक यांना मी निवेदन करू इच्छितो की, कुंभमेळ्यासाठी पैशांची कमी पडू देणार नाही, यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीही अश्वस्थ केले होते. जितका पैसा यासाठी गरजेचा असेल तितका देण्यात येईल. कुंभमेळा हा आस्थेचे प्रतीक आहे. या मेळ्यामुळे नाशिक आणि महाराष्ट्राचे नाव संपूर्ण जगात पोहोचते. त्यामुळे आम्ही सोयीसुविधा देण्यात अजिबातच मागे राहणार नाही. अजून जितक्या निधीची आवश्यकता असेल तितका आम्ही देऊ. काही काम अजून बाकी राहिले असेल तर तेदेखील पूर्ण करण्यात येईल.’ देवेंद्रफडणवीस, मुख्यमंत्री

निधीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा आवाज थंड
महापालिकेचीगरज ओळखून आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनीही तातडीने अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. महाराष्ट्रात अवेळी येणारा पाऊस आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याची भरपाई करण्यातच राज्य सरकारचा मोठा पैसा खर्च होतो. त्यामुळे केंद्राने आता कुंभमेळ्यासाठी मदत करावी. मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे नक्कीच विनंती करतील किंवा केलीदेखील असेल. पण, त्यांचा आवाज थोडासा थंड असेल. अमितभाई शहा यांनी त्यांच्या जोरदार आवाजात ही मागणी करावी. अमितभाईंनी त्यांचा शब्द पंतप्रधानांकडे खर्च केला, तर नाशिकला निश्चितच हजार-बाराशे कोटी रुपये मिळून जातील. केंद्राने निधी दिल्यास राज्याचा पैसा वाचून शेतकऱ्यांचीही अडचण दूर होईल आणि राज्य सरकारला मदतनिधी वाटण्यासही निधी मिळू शकेल. -छगन भुजबळ
शहा यांनीच वकिली करावी
‘जकातएलबीटीचे उत्पन्न बंद झाल्यामुळे महापालिकेसमोर मोठीच आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. उपलब्ध निधी नागरी कारणांसाठी खर्च होणे अपेक्षित असताना तो कुंभमेळ्यावर खर्च होत आहे. नाशिककरांच्या हक्काचा निधी आम्ही कुंभमेळ्यावर खर्च केला आहे. केंद्राने अलाहाबादमधील कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी, तर उज्जैनसाठी ६०० कोटी रुपये निधी दिलेला असताना नाशिककडे मात्र दुर्लक्ष केले आहे. या निधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अमित शहा यांनीच आमची वकिली करावी, असे साकडे महापौर अशोक मुर्तडक यांनी घातले.