आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांची गोदामातेकडे राष्ट्रकल्याणासाठी प्रार्थना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी सहकुटुंब गोदावरीची पूजा केली. - Divya Marathi
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी सहकुटुंब गोदावरीची पूजा केली.
नाशिक - भाजपाध्यक्षअमित शहा यांनी गोदेचे पूजन करून रामकुंडातील गोदाजल अंगावर शिंपडून घेत ‘मार्जन स्नान’ केले. त्यांनी आत्मकल्याण, राष्ट्रसमृद्धी, पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्य, विजयश्रीची प्रार्थना केली.

बुधवारी सकाळी ६.४५ वाजता रामकुंडावर पत्नी, पुत्र जय आणि स्नुषा यांच्यासमवेत पूजा केली. त्यानंतर अमित शहा यांनी गंगापूजनाचा संकल्प सोडला. त्यांनी श्रीफळ, पुष्प, दूध, कुंकू, हळद वाहून गोदावरी मातेचे पूजन केले. त्यानंतर त्यांनी गंगा -गोदावरी मंदिराचे दर्शन घेतले.

‘मनको संतोष हुआ’
अनेकदिवसांपासूनची कामना पूर्ण झाली. गोदापूजनामुळे मनाला अतिशय आनंद वाटला. गोदास्नानामुळे धन्य झाल्यासारखे वाटले, अशी भावना शहा यांनी व्यक्त केली. पुरोहित संघाच्या व्हिजिटबुकमध्येही त्यांनी नोद केली.