आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगले ‘रिसेप्शन ऑन व्हील्स’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कोणत्याही रिसेप्शनसारखेच उत्साही वातावरण येथेही होते. नवपरिणित वधू-वरांबरोबरच स्वागतार्थ उभी ज्येष्ठ मंडळीही होती. गाणी ध्वनिक्षेपकावर वाजत नव्हती, तर पाहुणे मंडळी स्वत:च म्हणत होती. अन्यत्र लॉन्स-हॉटेल सजवले जाते, इथे साज चढला होता तो रेल्वेतील एका बोगीला.. भारतीय रेल्वेच्या सुमारे 160 वर्षांच्या इतिहासात सोमवारी प्रथमच रेल्वेत नवदांपत्याच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी रेल परिषदेने पुढाकार घेऊन आदर्श कोचच्या परंपरेला साजेसा उपक्रम घडवतानाच सामाजिक भानही राखले.

पंचवटी एक्स्प्रेसने रोज प्रवास करणारे रेल परिषदेचे सदस्य श्याम जाधव व सारिका यांच्या विवाहानिमित्त हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी परिषदेच्या सदस्यांनी गाणी गाऊन धमाल करीत समारंभाला रंगत आणली.

रेल परिषदेने सहा वर्षांपूर्वी पंचवटी एक्स्प्रेसचा हा एसी कोच आदर्श कोच बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक उपक्रम राबवून विविध सुविधाही करण्यात आल्या. व्ही. जे. आर्य, शिवाजी मानकर, शशिकांत मुळे, बिपीन गांधी, पवन दोडामणी, कमलेश बाफना, देवीदास पंडित आदी उपस्थित होते. प्रिया तुळजापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.