आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Android Application News In Marathi, Paid Android, Gadget, Nashik

सावधान, आता पेड अँण्ड्रॉइड अँप्सची चोरी पडणार भारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अँण्ड्रॉइड अँप्लिकेशन स्टोअरवर मिळणारे प्रीमियम म्हणजेच पेड असणारे अँप्लिकेशन पैसे न देता डाउनलोड करण्याचा फंडा नेटकर्‍यांना महाग पडणार आहे. पैसे देऊन खरेदी करावे लागणारे हे अँप्लिकेशन पैसे न देता वापरायला मिळत आहेत या मोहात असंख्य पद्धतीने हे अँप्लिकेशन्स चोरले जातात असेच म्हणणे योग्य राहील. मात्र, ही पद्धत आपल्या गॅजेटपासून व्यक्तिगत आयुष्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवर परिणाम करणारी आहे.
अँप स्टोअरवर केलेल्या कॅटेगरीप्रमाणे फ्रीमियम, प्रीमियम, एडिटर्स चॉइस असे अँप्लिकेशन्सचे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये प्रीमियम अँप्लिकेशन हे पेड असून, हे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट रक्कम सर्व्हरला द्यावी लागते. ही रक्कम मिळाल्याची खात्री झाल्यावरच या अँप्लिकेशनची डाउनलोड लिंक आपल्यासमोर येते. या सगळ्या प्रोसेसमधून जाताना अँप्लिकेशनला काही पायर्‍या पार कराव्या लागतात, ज्यामुळे त्याची सत्यता टिकून राहते. जसे इनिशिअलायझिंग, लोडिंग किंवा अँप परमिशन. जेव्हा हेच पेड अँप्लिकेशन आपण एखाद्या सर्व्हरवरून पैसे न देता डाउनलोड करतो, तेव्हा या पायर्‍या गाळल्या जाऊन अँप्लिकेशन इन्स्टॉल होण्यासाठी तयार मिळत, ज्याने ही बाब स्पष्ट होते, की त्या अँप्लिकेशनची जवाबदारी आता सर्व्हरची राहिलेली नाही.

पुढे वाचा अँप्लिकेशन चोरीमुळे होणारे दुष्परिणाम..