आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँड्रॉइड युजर्स, ‘रॅनसोमवेअर’पासून राहा सावधान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारता मध्येस्मार्टफोन्स वापरणाऱ्यांची संख्या ९० टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, भारतीय अँड्रॉइड युजर्सना रॅनसोमवेअरच्या धोक्याची माहिती नाही. ‘अॅडल्ट प्लेअर’ नावाच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्सना ब्लॅकमेल केले जात आहे. ही गोष्ट रॅनसोमवेअर या प्रकारात मोडते. कोणत्याही युजरच्या प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवून मानहानीची भीती दाखवत पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार या गोष्टीतून उघड झाला असल्याने युजर्सनी याबाबत सावधान राहण्याची गरज आहे.
फसवणूक करून पैसे उकळणाऱ्या सायबर लिंक्स, मोबाइल अॅप्लिकेशन्स डिव्हाइसचा ताबा घेतात. कॉम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये अशी लिंक ओपन झाल्यास ते डिव्हाईस बंद पडते. पैसे भरल्याशिवाय कोणतेही ऑपरेशन्स त्यावर करता येत नाही. रॅनसोमवेअरच्याबाबत भारतातील युजर्सना असे अनुभव आले ते ई-मेलद्वारे आलेल्या लिंक्सचे. या लिंकच्या माध्यमातून लोकांना तुम्ही फसला आहात, तुमचा डाटा डिलीट केला जाऊ शकतो किंवा तुमचे अकाउंट हॅक झाले आहे, असे मेसेज पाठविले जातात. मोबाइलमधील अति खासगी गोष्टी सर्व्हरवर अपलोड करण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि असे करण्यासाठी पैसे मागितले जातात. २०१२ मध्ये अशा सायबर थ्रेट्सना सुरुवात झाली. तर, २०१४ पासूनची आकडेवारी पाहिल्यास १२७ टक्क्यांपेक्षा जास्त अॅप्लिकेशन्स अशा प्रकारे युजरचा गैरफायदा घेत असल्याचे इंटेल सिक्युरिटीजच्या सर्व्हेमधून निदर्शनास आले.

डाउनलोड झाल्यास सुटका कशी? : असे अॅप्लिकेशन किंवा लिंकने तुमच्या डिव्हाईसचा ताबा घेतल्यास डिव्हाईस रिबूट करून सेफ मोड मध्ये सुरू केल्यास फोन पूर्ववत सुरू होतो.
{कितीही महत्त्वाचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करायचे असले तरी प्ले स्टोअर किंवा अन्य अ‍ॅप स्टोअर शिवाय डाउनलोड करू नये.

{ई-मेलवर आलेल्या ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन अपडेट किंवा डाउनलोड लिंक ओपन करू नये. {कॉम्प्युटर किंवा मोबाइलचा सगळा डाटा बॅकअप केलेला असावा.
{अननोन सोर्सेस असलेल्या कोणत्याही अ‍ॅपवर विश्वास ठेवू नये.
{डाउनलोड करताना टर्म्स अ‍ॅण्ड कंडिशन्समध्ये त्या अ‍ॅप्लिकेशनचे अ‍ॅक्सेस पॉइंट तपासून घ्या.

पॉर्न बंदीबाबतच्या बातम्या आल्यानंतर पॉर्न साईट्स चालविणाऱ्या व्यक्तींनी कितीतरी पॉर्न अ‍ॅडिक्टना ब्लॅकमेल करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. ज्यामध्ये अ‍ॅडल्ट प्लेअर नावाचे पॉर्न अ‍ॅप्लिकेशनचे आमिष दाखवून ते डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर संबंधित फोनचा ताबा घेत ५०० डॉलरची मागणी केली जाते. तसे केल्यास अ‍ॅप्लिकेशनने युजरने काढलेले फोटो पॉर्न वेबसाइटवर पोस्ट करण्याची धमकी दिली जाते. मोबाइल पूर्णपणे बंद होऊन फक्त पैसे द्या, असा मेसेज दिसत असल्याने हे अ‍ॅप्लिकेशन अनइन्स्टाॅल करणे अशक्य होते.

धोका लक्षात घ्या...
^सोशल नेटवर्किंग साईटवर टिनएजर्संना केंद्रस्थानी ठेवत हॅकर्स त्यांच्याशी मुली बनून गप्पा मारतात. त्यांना पॉर्न क्लिप दाखवली जाते, ही क्लिप पाहताना त्यांचा स्क्रीनशॉट घेतला जातो. हे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची भीती दाखवत पैसे उकळले जातात. अशा प्रकरणात कलम ४३ ६६ अन्वये पोलिस ठाण्यात तक्रार करता येते. अ‍ॅड.प्रशांत माळी, सायबर सिक्युरिटी, सायबर क्राईम एक्स्पर्ट, मुंबई