आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anger In Mahaaghadi, Shiv Sena BJP Attension On MNS Faction

महाआघाडीत धुसफूस, अपक्षांचाही दावा - शिवसेना-भाजपचे लक्ष मनसेतील फुटीकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: महापौरांच्या ‘रामयण’ या निवासस्थानी महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या उपस्थितीत मंगळवारी मनसे राष्ट्रवादीच्या पदािधकाऱ्यांची प्रभाग सभापतिपदाबाबत खलबते सुरू हाेती.
नाशिक - महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मंगळवारी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्ष या महाआघाडीत धुसफूस झाल्याचे चित्र दिसून आले. काँग्रेस महाआघाडीत असले तरी त्यांच्या नेत्यांनी ‘रामायण’ या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली. दुसरीकडे पाच सदस्यांच्या जाेरावर महत्त्वाची पदे मिळवणा-या अपक्षांनी प्रभाग समितीवरही दावा केल्यामुळे महाआघाडीत बिघाडीचे चित्र हाेते. मात्र, दुपारपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर पक्षातील पदाधिका-यांनी संभाव्य डॅमेज कंट्राेलसाठी ब-यापैकी यश मिळवले. दुसरीकडे शिवसेना भाजपचे लक्ष मनसेतील फाटाफुटीकडे असून, महाआघाडीच्या तुलनेत युतीच्या हालचाली मंदावल्याचे दिसत हाेते.

बुधवार गुरुवारी दाेन टप्प्यात प्रत्येकी तीन याप्रमाणे समित्यांसाठी निवडणूक हाेणार आहे. त्यासाठी मंगळवारी सकाळी ११ ते या वेळेत अर्ज स्वीकृती तसेच दुपारी वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत हाेती. स्थायीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मनसे राष्ट्रवादी-काँग्रेस यांची युती उघड झाली. प्रभाग समित्यांचे नियाेजन करताना महाआघाडीने उघडपणे वाटाघाटी केल्या. रामायण या निवासस्थानी उभय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकी झाल्या. प्रामुख्याने मनसेकडून महापाैर अशाेक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम काेंबडे, सभागृहनेते सलीम शेख हे, तर राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष अर्जुन टिळे, विराेधी पक्षनेता कविता कर्डक, अपक्षांकडून उपमहापाैर गुरमित बग्गा, तर गटनेते संजय चव्हाण हे उपस्थित हाेते. महाआघाडीच्या गणिताने नाशिकराेड वगळता पाचही समित्या पारड्यात येण्याची चिन्हे आहेत. केवळ नाशिक पूर्वमध्ये मनसेच्या माजी पदाधिका-यांनी चमत्कार केला तर भाजपचे विद्यमान सभापती प्रा. कुणाल वाघ यांना दुस-यांदा संधी मिळू शकते.

महापाैरपदासाठी महाआघाडी केल्याची शिक्षा आता भाेगावी लागत असल्याची प्रतिक्रिया मनसेचे नगरसेवक ‘रामायण’ येथे खासगीत व्यक्त करीत हाेते. राष्ट्रवादीला नुकतेच स्थायीचे सभापतिपद दिल्याने त्यांच्याकडून मनसेला जास्तीतजास्त प्रभाग समिती सभापतिपद देणे अपेक्षित हाेते, अशी प्रतिक्रिया एका प्रमुख पदाधिका-याने खासगीत व्यक्त केली. तीन समित्यांची मनसेची मागणी फेटाळून आकडा दाेनपर्यंत आणण्यात यश मिळाले. त्यानुसार सिडकाे सातपूर या दाेन समित्या मनसेला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीलाही पंचवटी प्रभाग समितीच्या रूपाने एकमेव समिती मिळण्याची चिन्हे आहेत. पंचवटी प्रभाग समितीच्या निमित्ताने रूपाली गावंड सुनीता शिंदे या दाेघांमध्ये रस्सीखेच आहे. सूत्रांच्या मते गावंड यांना स्थायी समिती सदस्यपद दिल्यामुळे शिंदे यांचे नाव निश्चित हाेण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचीफरफट : महापाैरपदाच्यानिवडणुकीत मनसेला तर स्थायीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जाहीर मतदान करूनही काँग्रेसच्या वाट्याला काहीच पडले नसल्याची खंत नगरसेवक व्यक्त करीत आहेत. तूर्तास महाआघाडीत नाशिक पश्चिमचे सभापतिपद याेगिता आहेर यांना जाण्याची शक्यता असली तरी, दुसरीकडे विमल पाटील यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. महिला बालकल्याण समिती राष्ट्रवादीकडेच आहे. अपक्षांकडे उपमहापाैरपद आहे. त्यामुळे किमान काँग्रेसला दाेन प्रभागात समिती सभापतिपद साेडावे यासाठी बुधवारी मुंबईतील काँग्रेस श्रेष्ठींकडे कैफियत मांडली जाणार असल्याचे एका नगरसेवकाने खासगीत सांगितले. तूर्तास काँग्रेसने नाशिक पूर्वमधून वत्सला खैरे यांचाही अर्ज दाखल केला आहे. नाशिकराेड, सिडकाे सातपूरमध्ये काँग्रेसचा अर्ज नाही.

नाशिकराेडला बाय, शिवसेना नेत्यांची पाठ
नाशिकराेडप्रभाग सभापतिपदावर केशव पाेरजेंची जवळपास अविराेध निवड झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी मनसेच्या मदतीने सेनेने ही समिती राखली हाेती. येथे सुनील वाघ वैशाली भागवत यांचे अर्ज आले. महाआघाडीने अर्ज दाखल करून सेनेला बाय दिला आहे. अर्थात येथे तिन्ही पक्षांचे संख्याबळ एकत्र करूनही गणित जुळत नसल्याने माघारीशिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे दुपारी वाजले तरी प्रमुख पदाधिकारी नसल्याने इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळावे लागले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर आल्यानंतर पाेरजेंसह सिडकाेत शाेभा निकम, तर सातपूरला नंदिनी जाधव यांनी अर्ज दाखल केला.

हे असू शकतील संभाव्य सभापती
नाशिकराेड- केशव पाेरजे (शिवसेना)
सिडकाे - कांचन पाटील (मनसे)
सातपूर - उषाताई शेळके (मनसे)
पंचवटी - सुनीता शिंदे (राष्ट्रवादी)
नाशिक पश्चिम- याेगिता आहेर (काँग्रेस)
नाशिक पूर्व - शबाना पठाण (अपक्ष)

अपक्षांची चांदी
निव्वळपाच सदस्य असूनही अपक्षांची पुन्हा चांदी हाेण्याची शक्यता असून, अपक्ष शबाना पठाण यांना नाशिक पूर्व प्रभाग सभापती केले जाण्याची दाट चिन्हे आहेत. येथे मनसेच्या दाेन, तर राष्ट्रवादीच्या एका इच्छुकाने अर्ज दाखल केला आहे. या व्यतिरिक्त भाजपच्या संपर्कात असलेले दामाेधर मानकर यांचाही अपक्षांच्या वतीने पंचवटी प्रभाग सभापतिपदासाठी अर्ज दाखल झाला आहे.

असे आहेत उमेदवार
नाशिकराेड- केशवपाेरजे (शिवसेना), सुनील वाघ ( रिपाइं-शिवसेना), वैशाली भागवत (शिवसेना)
सिडकाे- कांचनपाटील (मनसे), शाेभा निकम (शिवसेना)
सातपूर- दिनकरपाटील (भाजप), उषाताई शेळके (मनसे), सुरेखा नागरे (मनसे), नंदिनी जाधव (माकप-शिवसेना)
नाशिकपश्चिम - याेगिताआहेर (काँग्रेस), माधुरी जाधव (मनसे), सुजाता डेरे (मनसे), छाया ठाकरे (राष्ट्रवादी)
पंचवटी- ज्याेतीगांगुर्डे (भाजप), विमल पाटील (काँग्रेस), सुनीता शिंदे, रूपाली गावंड (राष्ट्रवादी), रुची कुंभारकर, गणेश चव्हाण (मनसे), दामाेधर मानकर (अपक्ष)