आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारनियमन अतिरेकाने वीजग्राहकांचा भडका, राजकीय पक्षांपाठाेपाठ नागरिकांचीही अांदाेलनाची भाषा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक, सिडको - शुक्रवारी (दि. ६) दिवसभरही शहरातील विविध भागात अनेक वेळा वीज गायब झाल्याने अघाेषित भारनियमनाने नाशिककरांमध्ये निर्माण झालेला असंताेष अाणखी उफाळला. राजकीय पक्षांनीही नागरिकांच्या भावनांशी सहमती दर्शवत अांदाेलनाचा इशारा दिल्याने या प्रश्नाची तीव्रता वाढली अाहे.
 
सिडकोसह अंबड अाैद्योगिक वसाहतीला वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणाचा फटका बसला. खंडित पुरवठा पुन्हा कधी सुरू होणार, याबाबतही माहिती मिळत नसल्याने नागरिक वैतागून गेले हाेते. अगोदरच वीज बिलांचा गोंधळ अाणि त्यात वीजपुरवठा खंडित हाेण्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. भारनियमनाच्या विरोधात नागरिकच अाता आंदोलनाची भाषा बाेलू लागले आहेत. 
 
गुरुवारनंतर शुक्रवारीही वीजपुरवठ्याचा सावळा गोंधळ सुरू राहिला. सिडकाेसह कामटवाडे, डीजीपीनगर भागात गुरुवारी दाेन-तीन वेळा सलग दाेन तास वीज गायब झाली हाेती. शुक्रवारी पाऊस झाल्याने तब्बल सहा तास वीज नव्हती. नागरिक ग्राहक केंद्राशी संपर्क साधत होते. मात्र, ताे होऊ शकत नव्हता. यामुळे नागरिकांना निश्चित माहिती मिळत नव्हती. वीज बिल भरण्यास विलंब झाला तर तत्काळ पुरवठा खंडित करणारी वीज वितरण कंपनी यात सुधारणा करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 
 
बिलांचा गोंधळ वेगळाच... : सिडको,मोरवाडी भागात नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आहेत. वीज बिल देणाऱ्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणाचा फटका अनेक नागरिकांना बसला. महिन्याचे बिल फक्त ३०० ते ४०० रुपये येते, त्यांना तब्बल ४० ते ५० हजार रुपये बिल आल्याने अनेकांचे डोळेच पांढरे झाले. काेणतीही चूक नसताना अनेक नागरिकांना वीज मीटर बदलावे लागले. त्यात अाता अचानक केलेल्या भारनियमनाने वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल माेठी नाराजी पसरली अाहे. 

शहरात अघाेषित भारनियमन सुरू असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कांॅग्रेसने शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदिलाची भेट दिली. 

राष्ट्रवादीची महावितरण अधीक्षक अभियंत्यांना कंदील-मेणबत्ती भेट 
ऐनदिवाळीच्या तोंडावर नाशिककरांवर लादलेले वीज भारनियमन विद्युत महावितरण कंपनीने त्वरित रद्द करावे, अशी मागणी करीत शुक्रवारी (दि. ६) राष्ट्रवादी कॉंग्रेसने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना कंदील मेणबत्तीची भेटही दिली. ‘भारनियमन रद्द झालीच पाहिजे’, ‘भाजप सरकार हाय-हाय’, ‘महावितरणाचा निषेध असो’, अशा विविध घोषणा देत पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे त्यांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. 
बातम्या आणखी आहेत...