आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेठ्या नाेटांवर बंदी हे केवळ करेक्शन माॅडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देश अाता सकारात्मक बदलाच्या दिशेने असून, फार माेठ्या घुसमटीतून अापण बाहेर पडताेय अशीच सगळ्यांची भावना अाहे. अाता ही बदलाची प्रक्रिया कुणी लांबवू शकेल, पण थांबवू शकणार नाही. माेठ्या नाेटबंदी हे केवळ करेक्शन माॅडेल असून, अद्याप डेव्हलपमेंट माॅडेल बाकी अाहे. अाता भारत मागे राहणार नाही, लीडर बनेल, असे प्रतिपादन प्रख्यात अर्थतज्ज्ञ अाणि अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बाेकील यांनी केले.
येथील कालिदास कलामंदिरात झालेल्या व्याख्यानात बाेकील बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर अायाेजक अामदार देवयानी फरांदे उपस्थित हाेत्या. यावेळी बाेलताना बाेकील यांनी गत काही वर्षांपासून देशभरात पराकाेटीची निराशा येत चालली हाेती, असे सांगितले. काळा पैसा इतका प्रभावी झाला हाेता की सगळ्या व्यवस्थाच गाेंधळून गेलेल्या हाेत्या. काेणत्या व्यवस्थेत काेण चुकतंय ते कुणालाच कळत नव्हते. अशावेळी लाेकांनी माेदींना बहुमतासह निवडून दिले . जनतेने ही दिलेली ताकदच त्यांना अनेक माेठे निर्णय घ्यायला सहाय्यभूत ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. माेठ्या नाेटांवर बंदीचा निर्णय तर धाडसी म्हणण्याच्याही पलीकडचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कॅशलेस नव्हे लेस कॅश : अापल्यादेशातील व्यवस्था लगेच कॅशलेस हाेणे शक्य नाही. मात्र, लेस कॅश हाेत अापल्याला त्या दिशेेने जायचे अाहे. ज्याला तांत्रिक अडचणी अाहेत, असे ज्येष्ठ नागरिक अाणि कमी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ग्रामीण भारतासाठी कॅशलेस बनणे अवघडच अाहे. मात्र, ही एक प्रक्रीया असून नवीन पिढी या सर्व प्रक्रीयेला खूप लवकर अंगी बाणवून घेणार अाहे. येणारा काळ हा प्रामुख्याने डीजीटल मनीचाच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राहअामची अर्थक्रांती संस्था खूप छाेटी अाहे. अाम्हाला बदल हा व्यवस्थेतूनच हवा अाहे. मात्र, सरकार हा बदल कायद्यातूनच घडवून अाणत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या व्याख्यानाच्या शुभारंभप्रसंगी व्यासपीठावर अामदार देवयानी फरांदे, प्रा. सुहास फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. , निलीमा पवार, सुनील भायभंग, जयेश ठक्कर, लक्ष्मण सावजी, संताेष मंडलेचा, सुनील काेतवाल, अविनाश अाव्हाड, राजेंद्र अाहेर, मिलींद कुलकर्णी , विजय सानप अादी मान्यवर उपस्थित हाेते. पाहुण्यांचा परिचय मिलींद कुलकर्णी यांनी करुन दिला. तर सुत्रसंचलन अनील भालेराव यांनी केले.

सर्जनचा हात कापत नाही : अाॅपरेशन केल्यानंतर पेशंटचा राेग बरा हाेणार अाहे, हे माहिती असल्यावर सर्जनचा हात कापत नाही. त्याप्रमाणेच देशाच्या भ्रष्टाचारावर शस्त्रक्रीया करायला निघालेल्या माेदींचे मनही विचलीत हाेत नाही. इतके माेठे अाॅपरेशन करताना ते ब्लडलेस हाेत नसते. मात्र, कमीतकमी रक्तपात व्हावा, अशी काळजी माेदीनामक सर्जन घेत असल्याचेही बाेकील यांनी नमूद केले. अाॅपरेशन करताना डाॅक्टरइतकाच रुग्णही महत्वाचा असताे. रुग्णाने सकारात्मक प्रतिसाद दिला तरच ताे बरा हाेणे शक्यत हाेते असेही त्यांनी सांगीतले. व्याख्यानासाठी माेठी गर्दी झाली हाेती. सभागृह पूर्णपणे भरल्याने बाहेर स्क्रीन लावण्यात अाला हाेता. तेथेही श्राेत्यांची गर्दी हाेती.

रस्ता दुरुस्ती करायची तर...
माेदींनाजर माेठ्या नाेटा चलनातून काढायच्या अाहेत, तर त्यांनी हजारच्या नाेटा का अाणल्या , असा प्रश्न विचारला जाताे. त्यावर साध्या साेप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या माेठ्या रस्त्याची दुरुस्ती करायची असेल तर त्याला बायपास राेडची काहीतरी व्यवस्था करावी लागते. तशीच ही बाजूने केलेली एक व्यवस्था अाहे, असे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत असल्याचे बाेकील म्हणाले.

त्या बळींचे पितृत्व मी घेताे
याप्रचंड धाडसी निर्णयाने अनेकांना त्रास हाेताेय. पण तरीही काहीतरी चांगले घडेल या अाशेने नागरिक ताे सहन करीत अाहेत. एका पत्रकाराने मला विचारले हाेते की या रांगांमध्ये उभे राहिल्याने ५५ जणांचे बळी घेतले अाहेत, त्यांचे काय ? त्यावर मलादेखील क्षणभर वाईट वाटले. त्यानंतर मी त्याला म्हणालाे की त्या बळींचे पातक माझ्या माथी घ्यायला मी तयार अाहे. पण या निर्णयामुळे किती जणांचा जीव वाचलाय, त्याचा तुम्ही विचार किंवा अभ्यास केला अाहे का ? असे विचारल्याचे बाेकील यांनी नमूद केले.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
{ कमी जागेत प्रचंड घनता असलेल्या लाेकसंख्येचा जपान प्रगत राष्ट्र हाेऊ शकताे तर अापणही तसे बनू शकताे.
{ बिघडलेली व्यवस्था नसली तर भारतीयांची दैवी वृत्ती वर येते, हे मुंबईतील जलप्रलयावेळी दिसून अाले.
{ इतक्या माेठ्या निर्णयाबाबत प्रसार माध्यमांची भूमिकाच समजेनाशी झालेली अाहे.
{ बँकांमध्ये प्रचंड पैसा अाल्यानंतर काही काळाने व्याजदर निश्चितपणे खाली येतील.
{ प्रगत देशांत२ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तसे भारतातही मिळणे शक्य हाेऊ शकेल.
{ निर्णयानंतर काही काळ जीडीपी थाेडासा उतरेल, पण तेदेखील थाेडा काळ.
{ एकदा गाडी रुळावर अाल्यावर मात्र निदान काही वर्षे तरी भारतात मंदीची शक्यता नाही.
{ युवकांना अारक्षणापेक्षा स्वस्त भांडवल हवं असून, बँॅकांमध्ये पैसा अाल्याने ते मिळू शकेल.
{ करात बदल हाेत नाही, ताेपर्यंत काळा पैसा चलनात राहताे. त्याकडेंही सरकारचे लक्ष अाहे.
{ जीएसटी माेठ्या लाेकसंख्येच्या देशांना व्यवहार्य नाही. त्याएेवजी अापल्याला चालू शकेल, अशी स्वदेशी कररचना अाणावी लागेल.
{ जनमानसाच्या कलावरच राजकीय दृष्टीकाेन ठरत असल्याने नागरिकांनी सरकारला तसा पाठिंबा द्यावा.
{ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा नाेटबंदीचा निर्णय हा भविष्याचे दरवाजे उघडण्यासाठीचा पासवर्ड अाहे. त्या फाेल्डरमध्ये अजून बरेच काही असल्याचे अापल्याला काही काळाने दिसेल.
अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांच्या नाेटबंदीवरील व्या‌ख्यानासाठी झालेल्या गर्दीेने महाकवी कालिदास कलामंदिर असे तुडुंब भरले हाेते.
बातम्या आणखी आहेत...