आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुधन अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून अपेक्षित ठिकाणी बदलीसाठी वीस हजारांची मागणी करत त्यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. पुंडलिक धर्मा बागुल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. डॉ. बागुल याच्या म्हसरूळ येथील निवासस्थानीच सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा सापळा रचण्यात आला होता. तक्रारदार मखमलाबाद येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक आहेत.विभागाने सर्वसाधारण बदलीच्या काेट्यातून तुमची बदली होऊ शकली नाही, असे सांगून डॉ. बागुल याने तक्रारदाराकडे तुमची बदली करून देताे, २० हजार रुपये द्या, अशी मागणी केली हाेती. त्यापैकी १० हजार रुपये अाधीच देण्यात अाले हाेते. उर्वरित दहा हजारांसाठी डॉ. बागुल याने दवाखान्याला वेळोवेळी भेट देऊन तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. तसेच, पैसे दिल्यास कामकाज योग्य नसल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याची धमकीही दिली. त्यानंतर तक्रारदाराने दहा हजार रुपये देणे शक्य नाही, असे सांगत पाच हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यावर तडजाेड झाल्यावर या पर्यवेक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, विभागाच्या पथकाने संशयिताच्या म्हसरूळ येथील अजिंक्यतारा सोसायटीतील निवासस्थानी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...