आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ANIS Raids Bogus Doctor Who Claimed To Give No Addiction Medicines

दारू सोडवण्‍याचा दावा करणा-या तोतया डॉक्टरचे पितळ ‘अंनिस’ने केले उघडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- औषध देऊन दारू सोडवण्याचा दावा करणार्‍या एका तोतया डॉक्टरचे पितळ अंनिसच्या पदाधिकार्‍यांनी उघडे केले. व्यसन सोडविण्याची जाहिरात देत पैसे उकळण्याचा त्याचा उद्योग सुरू होता.

येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामास आलेल्या डॉ. लक्ष्मीकांत जाचक यांनी वृत्तपत्रातून व्यसनमुक्तीच्या शिबिराची जाहिरात दिली होती. दारूचे व्यसन सोडवण्याकरिता 999 रुपयांमध्ये औषधे देण्यात येणार असल्याचे त्यात नमूद केले होते. अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून त्याच्या मदतीने या डॉक्टरचा पर्दाफाश केला. तीन हजार रुपयांची मागणी करत मुदतबाह्य औषधांची विक्री डॉ. जाचक करत असल्याचे आढळले. या डॉक्टरने लेखी कबूलीजबाब देत पळ काढल्याची माहिती अंनिसचे कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, सुधीर धुमाळ यांनी दिली.