आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Bhau Sathe Anniversary,Latest News In Divya Marathi

अभिवादन लोकशाहिरा, वंदन लोकमान्यांना; लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व टिळक पुणयतिथीनिमित्त कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त, तसेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर व परिसरात विविध संस्था, संघटनांतर्फे ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे व प्रतिमा पूजनाने तसेच सवाद्य मिरवणूक काढून त्यांना अभिवादन करण्यात आले.
बहुजन स्वराज महासंघ
बहुजन महासंघातर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास संस्थापक अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अण्णा भाऊ साठे यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन नाथेकर यांनी उपस्थितांना केले. या वेळी सुभाष चव्हाण, अंकुश राऊत, राजाभाऊ भालेराव, कमलेश नागपुरे, सागर बत्तिसे, सविता गायकवाड आदी उपस्थित होते.
महाराष्‍ट्र कामगार सेना
महाराष्‍ट्र कामगार सेनेतर्फे सरचिटणीस दीपक जाधव, भारत गायकवाड, स्वप्नील जगताप यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सतीश शिंदे, सागर डे, नितीन गायकवाड, राजेंद्र नाठे, सिद्धार्थ गायकवाड, प्रशांत शिंदे, राजू नेटावणे आदी उपस्थित होते.
क्रांतिवीर लहूजी वस्ताद मित्र मंडळ
सातपूर महादेववाडी येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद मित्र मंडळातर्फे त्र्यंबकरोड येथे देखावा उभारण्यात आला होता. सभापती सुरेखा नागरे, नगरसेवक विलास शिंदे, नगरसेविका सविता काळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष धनंजय पाटोळे, योगेश गांगुर्डे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईराम मित्र मंडळ
पारिजातनगर येथे साईराम मित्रमंडळातर्फे प्रतिमापूजन करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम, रवी बांगर, संतोष गायकवाड, आत्माराम इंगळे, रामदास हिवाळे, धनंजय बांगर, दामोदर थोरात, नरेंद्र वानखेडे, गजानन उबाळे, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठान
सातपूर कॉलनी येथील डॉ. आंबेडकर मार्केट परिसरात नगरसेविका उषाताई शेळके
यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सोपान केदार, दिनेश अहिरे, विजय जगताप आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
साठे फाउंडेशन
साठे फाउंडेशनच्या वतीनेअण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी फाउंडेशनचे माजी जिल्हा सरचिटणीस देवीदास पगारे, नाना उलारे, बबन आव्हाड, नारायण अहिरे, सुभाष शेजवळ, सुरेश साबळे, अरुण पवार आदी उपस्थित होते.
तुळजाभवानी मंडळ
शिवसेनाप्रणीत तुळजाभवानी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे लोकशाहिरांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शिवाजी शहाणे, नाना काळे आदींच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्‍ट्रवादी काँग्रेस
शहर राष्‍ट्रवादी काँग्रेसतर्फे व अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त राष्‍ट्रवादी भवनात आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, चिटणीस दिलीप खैरे, चित्रा तांदळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी दत्ता पाटील, मधुकर मौले, बाळासाहेब सोनवणे, भगवान दोंदे, संजय खैरनार आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.