आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’ वर्धापनदिनानिमित्त आज उत्सवात ‘मॅनेजमेंट फंडा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दैनिक ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त जागतिक दर्जाचे मॅनेजमेंट गुरू, कॉर्पोरेट ट्रेनर व लेखक डॉ. एन. रघुरामन नाशिककरांना ‘मॅनेजमेंट फंडा’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि. 21) सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.‘दिव्य मराठी’ उत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून, मर्यादित आसनक्षमता असल्याने प्रथम येणा-या
वाचकांना प्राधान्य दिले जाणार आहे. डॉ. एन. रघुरामन जागतिक दर्जाचे मोटिव्हेशनल स्पीकर असून, त्यांच्या व्यवस्थापनविषयक विचारधारेने कोट्यवधी लोकांच्या विचारांत मोठा बदल घडवून आणला आहे. व्यवस्थापन तंत्र सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा त्यांचा हातखंडा आहे.
डॉ. रघुरामन सध्या मुंबई येथे वरिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. ‘दैनिक भास्कर’ समूहासाठी ते लिहीत असलेल्या ‘मॅनेजमेंट फंडा’ या स्तंभाने वाचकांमध्ये वेगळे स्थान मिळवले आहे. नाशिककरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात आले आहे.