आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सरकारी वकील मिसर यांच्या हत्येचा कट उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लष्कर ए ताेयबाचा अतिरेकी अबू जुंदाल, लाला बाबा बिलाल आणि मालेगाव बाॅम्बस्फाेटातील आराेपींविराेधात खटला चालविणारे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. विशेष माेक्का न्यायालयाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे मुंबई व नाशिक पाेलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविल्याने नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहातून हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. मालेगाव बाॅम्बस्फाेटातील संशयित आराेपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुराेहित यांच्या विराेधात खटला चालविणार्‍या सरकारी वकीलांना धमक्या दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच अ‍ॅड. मिसर यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिसर यांची केंद्र सरकारने सीबीआयच्या पॅनलवर व गृहविभागानेही एटीएसच्या खटल्यात त्यांना विशेष वकील म्हणून िनयुक्त केले आहे. मुंबईतील आॅर्थरराेडवरील माेक्का न्यायालयास दहा दिवसांपुर्वी गाेपनीय पत्र प्राप्त झाले हाेते. यात मिसर यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबराेबरच त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहात हा कट शिजविला जात असल्याचा समावेश हाेता. याबाबत न्यायालयाने तातडीने मुंबई पाेलिस आयुक्त, महासंचालकांना तपासाचे आदेश दिले. अ‍ॅड. मिसर हे अतिरेकी संघटना आणि संघटीत गुन्हेगारांच्या टाेळ्यांविराेधात शासनाची चांगल्या पद्धतीने बाजू मांडतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे प्रकरण गांभीर्याने हाताळावे, असे सांगण्यात आले. मुंबई व नाशिक पाेलिसांनी संयुक्तपणे तपासाची चक्रे फिरवले. या पत्रात एका माेबाईल नंबरचा समावेश हाेता. त्यादिशेने तपास केला असता सदरचा माेबाईल नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहात माेक्का अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आराेपीकडे सापडल्याची धक्कादायक बाब आढळून आली. त्यामुळे पत्रातील मजकूराला दुजाेरा मिळाला असून माेबाईलसह संशयितास पाेलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकारानंतर मिसर यांच्या सुरक्षितेतत वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
न्यायालयाकडूनच माहिती
अतिरेकी, माेक्काच्या गुन्हेगारांकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकीचे पत्र अथवा फाेन आलेला नाही. मात्र, आपल्याला जिवतीला धाेका असून हत्येचा कट पाेलिसांनी दक्षता घेतल्याने माहिती माेक्का न्यायालयाचे न्यायधीश ए.एल. पानसे यांच्याकडून मिळाली. न्या. पानसे यांनीच पाेलिसांना यबााबत माहिती दिल्याचे समजले - अजय मिसर, विशेष सरकारी वकील
बातम्या आणखी आहेत...