आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदावरीवरील दुसरा पूल खुला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गाेदावरी नदीवर दसक येथे उभारलेला दुसरा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात अाला आहे. अाठवड्यापूर्वी मलनिस्सारण केंद्राजवळील नवीन पूल खुला करण्यात अाला हाेता. गाेदावरी नदीवर अागरटाकळी शिवारात दाेन दसक येथे नवीन जुना प्रत्येकी एक असे पूल झाले असून, त्यामुळे आता या भागातील वाहतूक काेंडीचा प्रश्न निकाली निघणार अाहे.
गाेदावरी नदीवरील दसक येथे श्री संत जनार्दन स्वामी पुलाला समांतर पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात अाला. सन २००३ च्या कुंभमेळ्याच्या वेळी श्री संत जनार्दन स्वामी पुलाची उभारणी करण्यात अाली हाेती. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनंतर समांतर पूल उभारण्यात अाला अाहे.

समांतर पुलामुळे पंचवटी, अाडगाव, अाैरंगाबाद मार्गाला जाेडणाऱ्या पुलामुळे वाहतुकीची समस्या दूर हाेणार अाहे. यापूर्वी महापालिकेच्या वतीने अागर टाकळी येथे उभारलेल्या मलनिस्सारण केंद्रानजीक गाेदावरी नदीवर नवीन पुलाची उभारणी करण्यात अाली असून, ताे पूल अाठवड्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात अाला हाेता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकराेडला तीन नवीन पुलांची उभारणी करण्यात अाली असून, त्यापैकी गाेदावरी नदीवरील दाेन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले अाहेत, तर वालदेवी नदीवरील पुलाचे काम प्रगतिपथावर अाहे.

०४
नवे पूल झाले खुले
0५ मीटर पुलाची उंची
१.५ मीटरचा पदपथ
१०.२५ मीटर रुंदी
0८ मीटरचा पुलावर रस्ता
१२०
मीटर लांबी
नियोजन सिंहस्थाचे